दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : देशी गायीला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानिमित्त तिर्थक्षेत्र आळंदी येथील सुरभी सेवाश्रम गोशाळेला आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहूल चव्हाण यांनी मंगळवारी भेट दिली. या ठिकाणीं वेदमूर्तीच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा शहरप्रमुख राहूल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.
गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचे पूजन करण्यात येईल. तसेच गायींच्या देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे गोमातेचे जतन केले जाईल. राज्य सरकारने देशी गायीला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याबद्दल चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. शहर शिवसेनेच्या माध्यमातून या6 सरकारी निर्णयाची जनजागृती करण्यात येईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
यावेळी अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे, नितीन ननवरे, ज्ञानेश्वर गारकर, संदीप पाचुंदे, अनिल जोगदंड, माऊली महाराज पडघान, हिरामण तळेकर, दिनकर तांबे, चंद्रकांत जाधव, मनीषा थोरवे, श्रद्धा थोरवे, सायरा शेख, अशोक पारिक गुरुजी यांचे शिष्य तथा गोसेवक उपस्थित होते.
गोमाता भारतीय समाजात पवित्रता, करुणा आणि पोषण यांचे प्रतीक आहे. सरकारचा हा निर्णय केवळ गोमातेचे संरक्षण आणि सन्मान नवीन उंचीवर नेणारा नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठी एक आदर्श उदाहरण देखील असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राहूल चव्हाण यांनी सांगितले आहे.