आशा,गट प्रवर्तकांना शासकिय कर्मचारी दर्जा द्या… — पेन्शन व भाऊबीज द्या…  — मान्यवरांनी केली मागणी….

ऋषी सहारे 

    संपादक

  गडचिरोली :- आशा गट प्रवर्तक अतीशय उत्तम काम करीत आहेत. त्यांच्या काही मागण्या पूर्ण झाल्यात मात्र आशा गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा दिला पाहिजे. भाऊबीज मिळाली पाहिजे. या मागण्यांसाठी मी तुमच्या लढ्या सोबत नेहमी राईन , महीलांच्या हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध लढेन असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस महिला नेत्या डॉ शीलू चिमुरकर यांनी आयटक गडचिरोली आशा गट प्रवर्तक विजयी निर्धार मेळाव्यात प्रमूख पाहुणे म्हणुन मार्गदर्शन करतांना दिले.  

            आयटक , लाल बावटा हातात घेऊन कॉ. ए.बी. बर्धन जन्मशताब्दी वर्ष आहे. हाच वारसा घेऊन तुम्हीं लढत आहात. याचा अभीमान वाटतो. लाढल्या बहिणी काम करणाऱ्या बहिणी नाहीत का? त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा दिला पाहिजे असे ते या वेळी बोलताना म्हणाले.

          मेळाव्याचे अध्यक्षस्थान भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेते कॉ.महेश कोपुलवर यांनी विभुषित केले होते. मेळाव्याचे उद्घाटन आयटक राज्य सरचिटणीस कॉ.श्याम काळे यांनी केले.

            आशा गट प्रवर्तक संघटना राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. मंगल पांडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॉ.राजू देसले, कॉ.श्याम काळे यांनी आशा गट प्रवर्तक लढ्याचा आढावा घेतला. आयटक सन 2009 पासुन संघर्ष करीत आहे. या देशातील आयटक पहिली संघटना आहे. यात देशातील आशा गट प्रवर्तक सह दीड कोटी सभासद आहेत. या संघटनेशी आपणं जोडले आहात. याचा अभीमान वाटला पाहिजे.

             देशातील कामगार कर्मचारी, योजना कर्मचारी ना न्याय मिळवून दिला आहे. आशा गट प्रवर्तक सुद्धा न्याय मिळवून देणार आहोत.असे आश्वासन काळे यांनी आपल्या भाषणातून दिले.

             राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक आयटक यांनी आशा गट प्रवर्तकानी वर्ष भर रस्त्यांवर उतरून आंदोलन केले. ऊन,वारा,पाऊस सहन केला. सरकारने परीक्षा पाहिली. मात्र आयटक व कृती समिती ने 3 महिने संप करून विजय मिळविला आहे.

           मात्र दिलेलं आशा ना 7 हजार व गट प्रवर्तक ना 10 हजार रुपये वाढ व दिपावली सानुग्रह अनुदान व गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देण्याचे लेखी आश्वासन आरोग्यमंत्री यांनी दिले होतें. मात्र ते पूर्ण पाळले नाही व अथक संघर्ष करून 5 हजार वाढ केली.

          मात्र उर्वरित मागणी बाकी आहेत. राहिलेल्या मागण्यांसाठी आयटक संघर्ष करेल. आशांना 5 हजार वाढ झाली आहे. मात्र सप्टेंबर पासून 18 कामावर ते 5 हजार वाढ दिली जाणार आहे. हे 18 निकष आरोग्य अभियान सह संचालक यांनी त्वरीत रद्द केली पाहिजे. 

          मागील 4 कामावरच वाढीव मोबदला द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत. केंद्र सरकारने 2018 पासुन आशा गट प्रवर्तक ना एक रुपया वाढ दिलेली नाही. त्यामूळे केंद्र सरकार विरोधात तीव्र लढण्याचा निर्धार आजच्या या मेळाव्यात करत आहोत.

            जे मिळाले ते घेऊ या या पुढील काळात आशा गट प्रवर्तकांना पेंशन व सामजिक सुरक्षा मिळवण्यासाठी, शासकीय कर्मचारी दर्जा मिळवण्यासाठी लढा देऊ. 

          आशा गट प्रवर्तक लढा यशस्वी करण्यासाठी कॉ. विनोद झोडगे हे 35 दिवस मुंबईत होते. त्यांचा आज सत्कार करतांना आनंद होत आहे.

            डॉ.महेश कोपूलवार यांनी लढणाऱ्या आशा गट प्रवर्तकांचे अभिनंदन केले. या पुढील काळात आशा गट प्रवर्तक ना किमान वेतन व पेंशन साठी लढा तीव्र करावा.

         तसेच शेतकरी कष्टकरी चळवळ बळकट करावी असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेते कार्यक्रम अध्यक्ष ड्रॉ.महेश कोपुलवार यांनी केले या प्रसंगी राष्ट्रीय आशा गट प्रवर्तक संघटना अध्यक्षा मंगल पांडे यांनी या पुढील काळात दिल्लीत तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला.

            कॉ.विनोद झोडगे यांनी प्रास्ताविक भाषण केले.या प्रसंगी,माधुरी मडावी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, विश्वजित कोवासे,देवराव चवळे,अँड जगदीश मेश्राम,मीनाक्षी सेलोकर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.  

            मेळावा यशस्वी करण्यासाठी सरीता नैताम,विद्यादेवी येजुलवार,सोनाली ठाकरे,कविता दरवडे,संगीता मेश्राम,किरण गेडाम,हेमा मोहुरले,रजनी गेडाम,यांनी अथक परिश्रम घेतले.

           या विजयी मेळाव्याला जिल्हाभरातून हजारो संख्येने आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.