शासनाची 165 आश्रम शाळेला अनुदान देण्याची केलेली घोषणा हवेतच :- सामाजिक कार्यकर्ते रोशन जांभुळकर यांचा आरोप..

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

दखल न्युज भारत..

भंडारा :- आज आश्रम शाळेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अनुसूचित जातीच्या 165 आश्रम शाळांना सन 2019 ला 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती.परंतु आजपर्यंत त्या १६५ आश्रम शाळांना देण्यात आलेले नाही.  

      ज्या आश्रम शाळांना २००५ वर्षाला मान्यता मिळाली.त्या आश्रम शाळांना काही न करता अनुदान नियमित चालू आहे आणि अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना अजून पर्यंत अनुदान मिळालेलं नाही ही शोकांतिका आहे.

        त्यामुळे कर्मचारी वर्ग एवढा निरासमय झालेला आहे की ते काम करण्यास इच्छुक नाही.कित्येत संस्था संचालकांचे व कर्मचाऱ्यांचे निधन सुद्धा झालेला आहे.

         काही संस्थापक मरण्याच्या वाटेवर आहेत. ह्या गोरगरीब मुलांना आश्रम शाळेमध्ये सर्व सुविधा असल्यामुळे ते शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेताना जर आपण यांना अनुदान दिलं नाही तर शाळा कसे चालवावे?या चिंतेत संचालक वर्ग आहे.

        संस्थापकांची समस्या लक्षात घेता शासनाने 100% अनुदान अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना द्यावे अशी मागणी संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना मागणी केली.