अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
दखल न्यूज भारत
सिंदेवाही – येथील प्रभाग क्रमांक १३ मधील मंजुषा मोरेश्वर लोखंडे या महिलेस कर्करोग झाल्याचे निदान झाले.
घरची परिस्थिती हलाखीची हालाखीची असल्यामुळे कर्करोग सारख्या गंभीर व जीवघेणाऱ्या रोगाचा सामना करताना लोखंडे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले.
मंजूषा लोखंडे यांच्या आरोग्य व आर्थिक परिस्थिती संबंधाने प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली पुरेड्डीवार यांना माहिती होताच त्यांच्या आजाराबाबत व आर्थिक परिस्थिती बाबत राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना लक्षात आणून दिले.
यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मतदार संघातील प्रत्येक कर्करोग ग्रस्ताला आजवर करण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या सहकार्यरूपी सेवेचे व्रत जोपासत नेहमी प्रमाणेच आपल्या कार्यकर्त्यां मार्फत कर्करोग ग्रस्त मंजुषा मोरेश्वर लोखंडे यांना आर्थिक मदत दिली.
आर्थिक मदत करतावेळी प्रामुख्याने प्रभाग क्रमांक १३ च्या वैशाली संजय पुपरेड्डीवार नगरसेविका,महिला शहर अध्यक्ष प्रीती सागरे,नगरपंचायत उपाध्यक्ष मयूर सूचक,नगरसेविका पूजा रामटेके,नगरसेविका अंजू भैसारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जयश्री कावळे, नागापुरे,नगरसेवक युनुश शेख, शीला शेंडे,गोलू मस्के उपस्थित होते.