भागवत बोरकर
सामाजिक कार्यकर्ता/कवी..
चिमूर…
कधीकाळी मित्रान्वये एखादा विषय चर्चेला आला की,त्या मित्राची भरभरुन आठवण येतय आणि पटकन नजर फिरतय तो कुठे असेल?
वेळकाळ कसाही असो,”जगावे कसे व वागावे कसे, या विचारद्वंदातंर्गत त्याच्यासोबत अनेकदा चर्चा करताना अचूक उत्तर मिळायचे आणि वर्तमानात जगण्याचे विशिष्ट धैर्यगुण समोर झळकायचे..
जगताना अनेकांचा आदर व मानसन्मान करणारी त्याची वाणी विचार करायला लावणारी अशीच आहे.
स्वयंमता व शांतीवर लक्ष वेधताना,”आयुष्यातील परम विजय,असा गुणगौरव त्या शब्दातंर्गत करीत तो आयुष्यातील मर्म पुढे आणत असे.
कुणाचाही अपमान होणार नाही याची पदोपदी दक्षता घेणारा मित्र अनेक दिवस नजरेआड असतो तेव्हा त्याला भेटण्यासाठी आतुरता लागलेली असते.
त्या माझ्या मित्राला त्याच्या मागे कुणी काही म्हटले तरी तो म्हणतोय,”समज आणि नासमज जेव्हा एकमेकांच्या पुढे असतात तेव्हा विवेक जागरुक असेल तर सदभाव योग्य असेल व विवेक अशांत किंवा शंकाजनक असेल तर सदभाव अयोग्य असेल.
मात्र योग्य व अयोग्य परिभाषेतील परिणामत: चांगली असू शकेल किंवा वाईटही असू शकेल..पण कठीण प्रसंगात आत्मविश्वास व आत्मबल तारतय यावर त्याचा दृढ विश्वास आहे.
***
परघर…
काही कारणास्तव त्यांनी घर सोडले.घर सोडणाऱ्या अनेक मुद्दयावर एकांतवासात चर्चा करण्याचा प्रसंग पुढे केला तर “प्लिज साहेब!कृपया भाष्य करु नका हो,असे बोलून पाणावलेल्या डोळ्यांनी ते स्तब्ध होत होते..अर्थात त्यांच्या मनात कुणाही बाबत राग,अहंकार,द्वेष,कटूता अजिबात जाणवली नाही.
घर सोडल्यावर आठ दिवस ते माझ्या सोबत होते..परंतू मला त्यांच्या वागण्यात उर्मी दिसली नाही आणि मोठेपणाही आढळला नाही.त्यांच्यातील नंम्रपणा किती लाखमोलाची आहे हे त्यांच्या सोबतच्या सहवासातील दिवसात कळली.
त्यांच्यात माज तर कधीच दिसला नाही.
***
मित्रत्व…
अनेकांना राग येवू शकतो,त्यांच्या बाबतीत तो,त्याला,व इतर शब्दांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने.मात्र त्यांना अजिबात राग येणार नाही हे खात्रीपूर्वक आहे.
राजकीय,सामाजिक चळवळीतील त्यांची वाटचाल अतिशय संवेदनशील होती व स्वाभिमान आणि अस्मिता जपणारी होती.तद्वतच न वाकणारी होती.
कार्यालयीन कामकाजाचे नियोजन कसे करायचे हे त्यांनी न बोलता कृतीतून सांगीतले आहे.प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आपला मित्र असतो हे समजावून सांगताना शासन-प्रशासन आणि समाज यांच्यातील संबंधावर ते बारकाईने लक्ष केंद्रित करत…
मित्रत्वातील संबंध कसे जोपासायचे हे त्यांच्यातील सर्व परिस्थित्या आजही अवगत करून देतात.
आयुष्यात एखाद्याच्या बाबतीत भितियुक्त क्षण व वेळ जेव्हा समोर येतोय,तेव्हा दूर सारणारे मित्र व नातेवाईकही आपण बघितले असतील.
मात्र,कुठल्याही क्षणात,वेळात,काळात,धिर देत अळचणीच्या वेळी मदत करणारा त्यांच्यातील मित्रत्व आजही डोळ्यासमोर येतोय…
मित्रांना अळचणीतून बाहेर काढणारा मित्र म्हणून त्यांची अनेक वर्ष ओळख होती,कदाचित आजही असावी.
***
वेळ…
बघाना!,
त्याच्याकडे बरेच गुणधर्म व जगणारी धनदौलत असताना वैभव गमावून ते कंगाल झाले.नव्हे तर केल्या गेलय.
अनेक प्रकारच्या कुरापती करून त्यांना नाहक बदनाम करण्याचा त्यावेळेसचा सपाटा भयानक व भयंकर असाच होता.या काळात ते जगणार याची उमेद मला तरी नव्हती.
बेसहारा व अळचणीच्या काळात अनेकांनी त्यांना जवळ ठेवले नाही.त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या दुराभावनेंनी अनेकांनी बघितले.
अशाही स्थितीत वेळ काढताना ते कधी उपवासी झोपले तर कधी उघड्यावर झोपले.पण कुणाच्याही बद्दल अयोग्य कधीच बोलले नाही.
कठीण प्रसंगात त्यांची झालेली दशा,त्यांना झालेल्या यातना,समजण्यापलिकडच्या आहेत असे मी म्हणणार नाही. पण एकाच वेळी अनेक समस्यांचा व संकटाचा आणि बदनामीचा त्यांना करावा लागलेला सामना अतिशय क्लेशदायक असावा असे मला वाटते.
आजही ते कठीण परिस्थितीत दिवस काढत असल्याचे मला समजले आहे.
***
पाणटपरी व चर्चा..
चिमूरला एका पाणटपरीवर बसलो होतोय.अनोळखी असलेले दोन व्यक्ती त्यांच्याबाबतीत चर्चा करीत होते व मी कान देऊन ऐकत होतो.
त्यांच्या चर्चेवरून असे वाटले की,ते जिवंतपणी अनेकदा मरत आहेत.म्हणजे अजूनही ते खूप अळचणीत दिवस काढत आहेत असे कळले.
त्यांच्या बोलण्यातून मला हे सुद्धा जाणवत होते की मी त्यांचे जिवंतपणी मृतक शरिरच बघत आहे.
***
“साहेब!..
माझ्या बरोबर अनेक लोक त्यांना साहेब म्हणून हाक मारतात.पुढेही साहेब म्हणूनच हाक मारतील..
ते आजच्या स्थितीत पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांची निर्भिड,निरपेक्ष,स्वाभिमानी,अस्मितादर्शक पत्रकार म्हणून आजही ओळख कायम आहे.
त्यांना परत यशस्वी होण्यासाठी गतवैभव प्राप्त होवो हिच शुभेच्छा….
(त्यांचे नाव जाणिवपूर्वक अग्रलेखात येवू दिले नाही,याबद्दल दिलगीर आहे.)