ऋषी सहारे

संपादक

 

गडचिरोली :–आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा गडचिरोली

च्या वतीने आशा व गटप्रवर्तकांचा २9 सप्टेंबर रोजी कॉ विनोद झोडगे राज्य सचिव आयटक,भाकप राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. डॉ. महेश कोपुलवार,आयटक जिल्हाध्यक्ष कॉ देवराव चवळे, कॉ .अँड .जगदीश मेश्राम नगर सेवक आरमोरी, आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ .सरिता नैताम, सोनाली ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालय समोर जोरदार नारे देत विशाल धरणे व निदर्शने करत थाळी वाजवून सरकारचे लक्ष वधले. यानंतर मा .कुमार आशिर्वाद मुख्यकार्यकारी अधिकारी व मा. डॉ साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन विविध मागण्या विषय ही चर्चा करण्यात आली.जुलै महीण्या पासुन जिल्ह्यात मानधन थकीत असल्यामुळे आशा व गटप्रवर्तक संत्पत झाल्या होत्या सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत आशा वर्कर ला १८०००/-रु .व गटप्रवर्तक महिलांना दरमहा रूपये २५०००/– हजार किमान वेतन द्या,कंत्राटी कर्मचारी यांचे प्रमाने सुसूत्रीकरणात गटप्रवर्तकांचा समावेश करा व त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाने वेतन व भत्ते द्या , आरोग्य खात्यातील रीक्त पदावर ५० % जागा पात्रतेनुसार आशा व गटप्रवर्तक महिला मधुन भरा , वर्धिनी आरोग्य केंद्रातील थकीत मानधन व नियमित मिळणारा थकीत मोबदला /मानधन ताबडतोब अदा करा व या पुढे नियमीत दरमहा ५ तारखेच्या आत मानधान अदा करा .अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रमाणे दिवाळी भाऊबीज लागू करा.ग्राम पंचायत स्तरावरून कोरोना संपे पर्यंत मागील मे २०२० पासून मासिक १०००रु प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आहे परंतु काही ठिकाणी 6 महिने तर कुठे १ महिन्याचे देण्यात आले तेव्हा त्याची सर्वत्र अमलबजावणी करून त्वरित देण्यात यावा,२8 जून २०२२ रोजीचे परिपत्रक जिल्हास्तरावरील अकार्यक्षम आशा वर्कर चे नियुक्त आदेश रद्द करण्या बाबतचा शासन निर्णय मागे घेण्यात यावा,दर महिन्याला वेतन चिटी देण्यात यावे,संघटने सोबत दर महिन्याला तालुका व जिल्हा स्तरावर समस्या निवारण बैठक घेण्यात यावी ह्या प्रमुख मागण्यासह एकून १९ मागण्या यावेळी करण्यात आल्या.

  मागील जुलै महिन्यापासून मानधन थकीत आहे आशा व गटप्रवर्तकांना सध्या लागू असलेले वेतन सुद्धा मिळालेले नाही.व वर्धिनी आरोग्य केंद्रातील मानधन १ वर्षा पासुन थकीत आहे 

याबाबत मा मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधीकारी यांनी तातडीने सर्व त्यांच्या अधिकारातील मागण्या निकाली काढण्याचे शीष्टमंडळाला आस्वासन दिले. ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही .त्या कामाची सक्ती आशांच्यावर केली जाते .ती थांबवावी. अशी मागणी केली असता ,याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले ,की ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये असा प्रकार घडत असेल त्यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. समस्या सोडवण्यात येईल. ज्या मागण्या शासन स्तरावर त्या संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभियान व शासनाकडे पाठवून देण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आश्वासन दिले. मागण्या निकाली निघाल्या नाही तर ११ आक्टोंम्बर २०२२ रोजी मुंबई आझाद मैदानात कृती समितीचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही आयटक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे.

           आंदोलनात हजारोच्या संख्येने आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ संजय वाकडे,कॉ चुन्नीलाल मोटघरे, कॉ मनोज दामले,कॉ संगीता मेश्राम,कॉ विद्या येजुलवार,कॉ संजू शहारे,कॉ जोत्सना बन्सोड, कॉ मंजू कथले,कॉ माया कंबळें,संगीता माडेमवार यांनी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com