निरा नरसिंहपुर दिनांक 30

प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,  

इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे, इंदापूर शहर अध्यक्षपदी अमोल मिसाळ व इंदापूर तालुका युवक अध्यक्षपदी संदेश सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

आज शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात पश्र्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व लोनावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रभारी संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड पंचायत समितीचे उपसभापती व इंदापूर तालुका निरिक्षक विकास कदम दौंड तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे नरेश डाळींबे सरचिटणीस गणेश गायकवाड व इंदापूर तालुका मार्गदर्शक संदीपान कडवळे यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवाजीराव मखरे, विकास कदम,गणेश गायकवाड, संदीपान कडवळे,अमोल मिसाळ, नितीन झेंडे,यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक राकेश कांबळे केले तर आभार महेश सरवदे यांनी मानले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण मखरे विकास भोसले प्रताप मिसाळ जयकुमार सोनवणे दिगंबर चव्हाण भारत सावंत अर्जुन चितारे सोमनाथ चितारे यांनी परिश्रम घेतले

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com