दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
विद्वान विध्वतेच्या जोरावर खुप बोलतात व लिहितात.पण रस्त्यावर उतरणारा विद्वान मला एकही दिसत नाही,तेव्हा त्याची विद्वत्ता कुठे जाते हेही कळत नाही असे गंभीर तथा तितकेच संवेदनशील वक्तव्य क्रांतिवीर मानकर यांनी,”दखल न्यूज भारत,सोबत बोलतांना केले.
युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,”विद्वानांनी- शिकल्यासवरल्यानेच माझा रथ मागे आणला आहे,हे सत्य आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लक्षात घेतले तर,”विद्वान हे नुसते पुस्तकात बंदिस्त राहिले तर त्यांच्या विद्वत्तेचा फायदा गोरगरीब जनतेला,अशिक्षित जनतेला कसाकाय होणार?
आपण एससी-एसटींना वर्गीकरणाच्या नावाखाली संघर्ष करण्यास आव्हान केले आहे.समाज अजूनही अज्ञानात व गरीबीत खितपत पडलेला आहे,महाभयंकर दारिद्र्यात जिवन जगतो आहे,याविषयी आपण रस्त्यावर कधी उतरणार? असा ज्वलंत प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचे बोलून गेले.
विद्वान जर रस्त्यावर उतरत नसतील तर त्यांची विद्वत्ता किंवा विद्वानाची विद्वत्ता ही चार दिवारींच्या आत राहील.ती चार दिवारींच्या आत कोमेजून नष्ट होईल.त्यांच्या विचारांना कसल्याही प्रकारचे मूल्य असणार नाही हे लक्षात आणून दिले.
जर आपल्या विद्वत्तेचे मूल्य साधायचे असेल तर बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आपण जनमानसामध्ये आले पाहिजे,जनमानसात येऊन या देशाची सत्ता त्यांच्या पदरात पाडून घ्यायला पाहिजे.
म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र म्हणजे या देशातील,अस्पृश्य व शोषित-पीडित समाज हा सत्ताधीश झाला पाहिजे.
आपण गेल्या 70 वर्षापासून बघतो आहे,”नुसते विद्वान लोक,गप्पाच मारतात यात शंका नाही.
माझी कळकळीची विनंती आहे की,तमाम विद्वानांनी आता घरात बसून राहिणन्यापेक्षा रस्त्यावर येऊन झोपडी पर्यंत, गोरगरीब जनतेपर्यंत आपले विचार मांडून समाज एकत्रित करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अकराव्या खंडात म्हटले आहे,”परिवर्तनात्मक,असे संघटन वेळेनुसार व काळानुसार बांधने काळाची गरज आहे.परंतु वेळेनुसार-काळानुसार परिवर्तनात्मक संघटन होत नसून नुसतं घराणेशाहीला वाव दिली जाते आहे.
आता या तमाम बहुजनांचे नेतृत्व करण्यासाठी,देशातील तमाम विद्वान पुढे आले नाही तर क्रांतिवीर मानकर यांना वाटत की या देशात,”एससी-एसटी-ओबीसी-अल्पसंख्यांक,85 टक्के बहुजन समाज हा शासनकर्ती जमात होणार नाही.
ते म्हणतात जर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करायचे असेल आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करावी लागेल.
“वर्गीकरणाच काय,?तर..”भारतीय संविधानातील,कुठल्याही कलमाला हात लावू शकणारी औलाद पैदा झाली नाही आणि होणार नाही.मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असो की अन्य कोणी असोत.
न्यायमूर्तींच्या डोक्यात जर विद्वत्ता असती तर कदाचित त्यांनी वर्गीकरणाचा प्रश्नच निर्माण केला नसता असेही क्रांतिवीर मानकर म्हणतात.परत ते प्रश्न उपस्थित करतात की,विद्वत्ता अशा कोणत्या डिग्रीत आहे? लाॅ,ची डिग्री असली म्हणजे किंवा लाॅमास्टर असला म्हणजे विद्वान होतात काय?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या किती डिग्री होत्या ते पहा आणि त्या विद्वानाला जर चॅलेंज करणारे न्याय इथे देत असतील तर तुमची विद्वत्ता काय कामाची?ते म्हणतात मी ठळक भूमिका घेणारा व स्पष्ट बोलणारा माणूस,कळकळींन बोलणारा माणूस!”राग मानू नका,कारण वेळ तेवढीच महत्त्वाची आहे.
तुम्ही जर जागृत झाला नाहीत,तर जिवंतपणेच तुम्हाला जोडे मारणार तुमची अवलाद!..
आता जिवंतपणे सुद्धा तुमची अवलाद तुम्हाला जोडे मारतील,याची सर्वांनी जाणीव असू द्यावी,वेळ काळ महत्त्वाचा आहे तो समजून घ्या,पुढच्या पिढीला वाचवायचं असेल तर आता घराणेशाहीला बाजूला ठेवून परिवर्तनात्मक पुढे यायला पाहिजे.
जोपर्यंत तुम्ही परिवर्तनासाठी पुढे येणार नाही तोपर्यंत या देशातील मनुवादी तुमची फजिती करीत राहणार आहेत.अरे विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या आत्मसन्मानासाठी,अधिकारांसाठी,संघर्ष केला नसता तर तुमची फजिती तसीच असती..”गुलाम म्हणून?..
आणि त्यांच्यामुळे तुम्ही विद्वान झाले,नोकरीवर लागले,पेन्शन भेटत आहे,हे सगळी संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे हे जर तुम्हाला समजत असेल तर बाबासाहेबांची राहिलेली समाज उत्कर्षाची व समाज उन्नतीची कामे तुम्ही पूर्ण केव्हा करणार आहात? त्या उपकाराची परतफेड कशी करणार आहात?..
मोबाईल व्हाट्सअपवर, अनेक मीडियावर विचार मांडणे म्हणजे बाबासाहेबांचे उपकार फिटने नव्हे!”तुमची विद्वत्ता ही झोपडी पर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती झोपडी पर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा त्या झोपडीतला मुद्दा जिवंत होईल आणि आपल्या संघर्षासाठी तेथील नागरिक पुढे येईल.
म्हणून त्यांनी विद्वानांना कळकळीची विनंती केली आहे की एका मंचावर या आणि एका मंचावर येऊन महाराष्ट्र राज्यासह भीमचक्र दिल्लीच्या तक्त्यावर गोंदवण्यासाठी प्रयत्न करा…
तमाम विद्वानांनी आता एकत्र आलं पाहिजे,घराणे शाहीला बाजूला केलं पाहिजे,घराणे शाहीने या देशाचे वाटोळ केले आहे.मग काँग्रेस असो बीजेपी असो किंवा अन्य दलितांचे पक्ष असोत!..