युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- येथुन जवळच असलेल्या बेलोरा येथिल ५४ वर्षीय इसमाचा चंद्रभागा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल (३१) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
अर्जुन जानराव तायडे(५४) रा. बेलोरा असे बुडून मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव असून काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चंद्रभागा नदीच्या पुलावरुन जात असताना पाय घसरुन नदी पात्रात बुडाला होता.
दरम्यान या घटनेची माहीती तहसिलदार डॉ. रविंद्रकुमार कानडजे यांनी जिल्हा आपत्ती शोध पथकास दिली मात्र रात्र झाल्याने शोध पथकाची टिम आज (१) सप्टेंबरला सकाळीच घटनास्थळी दाखल झाली.
शोध पथकास घटनास्थळापासून १ कि. मी. अंतरावर बुडालेल्या इसमाचा मृतदेह सापडला.
बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढून खल्लार पोलिसांच्या स्वाधिन केला. खल्लार पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हारुग्णालय,दर्यापूर येथे पाठविला.
मृतकाच्या मागे पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.