नागपूर विभागीय प्रतिनिधी: ऋग्वेद येवले
साकोली: नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील एम.सी.व्ही.सी. विभागाचे प्रा. एन .पी. बावनकर तसेच विद्यालयातील संगीत शिक्षक झोडे या दोन व्यक्तींचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला. नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य के.एस.डोये तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.के.जी.लोथे प्रा.बी.पी.बोरकर , सौ. आर. बी.कापगते व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्कारमूर्ती प्रा. एन.पी. बावनकर सर व सी.जी.झोडे यांचा शाल व श्रीफळ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
प्रा. एन.पी. बावनकर व सी.जी.झोडे हे अतिशय मनमिळावू व्यक्ति असून आपल्या शालेय कामात अत्यंत तरबेज व वेळेवर निर्णय क्षमता आणि हजर जबाबीपणा असे व्यक्तिमत्व असून साधी राहणी व उच्च विचारसरणी अशा व्यक्तीची विद्यालयाच्या प्रगतीसाठी आवश्यकता आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य के.एस.डोये यांनी व्यक्त केले.
यावेळी के.जी.लोथे म्हणाले, आमचे एम.सी.व्ही.सी.मधील आर्टिकल्चर प्राध्यापक बावनकर सर सेवानिवृत्त होण्याने आर्टिकल्चर विभाग कायमचा बंद होणार तसेच संगीत शिक्षक सी.जी.झोडे सेवानिवृत्त होताना कायमचा संगीत शिक्षकाला आपण मुकणार याची उणीव विद्यालयात कधीच भरून निघणार नाही. याचे दुःख आपल्याला आहे तसेच शाळेच्या पायाभरणीमध्ये या दोन्ही शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे असे मौलिक विचार प्रा. लोथे सर यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यालयातील डि.डि. तुमसरे, सोनाली क-हाडे, यु. एन.कटकवार, बी.पी. बोरकर सर यांनी आपापल्या मनोगतातून मनमिळावू, स्मित हास्य, साधी राहणी उच्च विचारसरणी असा शब्दप्रयोग करून घेतला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डी.एस.बोरकर यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता स्नेहभजनाने करण्यात आले.