अवैध धंद्यावर अंकुश लावण्याची जबाबदारी कुणाची? — ते मुजोरी करतातच कसे? – समाज तुमचा,तुम्ही समाजाचे ना? — “याची डोळा,…. — तुमचे संरक्षण?

 

(विशेष अग्रलेख)

   प्रदीप रामटेके 

   मुख्य संपादक 

            गडचिरोली जिल्हा हा कायदेशीररित्या दारू मुक्त असला तरी या जिल्ह्यात जागोजागी देशी-विदेशी व मोह फुलांची दारु विकल्या जात असल्याची वार्ता जनमानसातंर्गत जागोजागी आहे.

           तद्वतच जिल्ह्यात सट्टा व्यवसायिकांनी आपापल्या ठिकाणी सट्टा व्यवसायाला बिनधास्त सुरुवात केली असून त्यांचा अवैध व्यवसाय तेजित असल्याचे जनमानसाचे मन व मत आहे.अर्थात गरीब लोक अवैध व्यवसायाबाबत बोलतात,सांगतात.पण,अनेक प्रकारच्या भीतीपोटी अवैध व्यवसायिकांच्या विरोधात ते समोर येत नाही हे वास्तव्य आहे. 

            म्हणूनच या दोन्ही अवैध व्यवसायाकडे पुरुष आणि तरुणांचा कल बऱ्याच पैकी वळलेला असून या दोन्ही व्यवसायातंर्गत ते आर्थिक नुकसानीचे बळी ठरत आहेत.तद्वतच सभ्य समाजातील पुरुष वर्ग व तरुण वर्ग हजारोच्या संख्येत बरबाद हतांना दिसतो आहे.अवैध व्यवसायांमुळे सातत्याने होणाऱ्या आर्थिक हानीमुळे समाजमन भयंकर चिंताग्रस्त झाले असल्याचे सुध्दा पुढे आले आहे.

             असे असले तरी दोन्ही व्यवसायावर अंकुश लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील व विदर्भातील कुणीही जबाबदार पुढे सरसावतांना दिसत नाहीत,या वास्तव्याला काय म्हणायचे?

           “वरील अवैध व्यवसायाचा ज्वलंत मुद्दा गडचिरोली जिल्ह्यातील व विदर्भातील समस्त लोकहिताला व लोक संरक्षणाला अनुसरून असल्याने,गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील जाणकार,समजदार,अनुभवी,समाजसेवक आणि आजीमाजी लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे की,आपण जनतेच्या हितासाठी व संरक्षणासाठी केव्हा अवैध व्यवसायावर बोलणार?आणि अवैध व्यवसायाला गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातून हद्दपार करण्यासाठी केव्हा पुढे सरसावनार? 

              कारण,”समाज हा तुमचा आहे आणि तुम्ही समाजाचे आहात,हे विसरून चालणार नाही.म्हणूनच जाणकार,समजदार,अनुभवी,समाजसेवक,आणि आजीमाजी लोकप्रतिनीधी हे समाज सुरक्षेचे महत्वपूर्ण अंग असतात व हेच अंग समाजाची उत्तम देखभाल व संरक्षण करु शकतात हे सत्य आहे.

         यामुळे,जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्या प्रमाणे,”याची डोळा,अवैध धंदे बघत असताना किंवा या धंद्या़ंकडे दुर्लक्ष करीत असताना आपलेच भाऊबंद व्यसनाधीन बनले आहेत व आपलेच भाऊ व्यशनाधीनतेमुळे बरबाद होत आहेत याचे आपणास भान आहे ना?

            याचबरोबर अवैध व्यवसायामुळे हजारो कुटूंबियांना पोहचत असलेली आर्थिक झड लाखो संसार विस्कळीत करतो आहे,बरबाद करतो आहे.लाखो तरुणांचे भविष्य उध्वस्त करतो आहे,याचे कुणाला सोयरसुतक नाही काय?

              प्रत्येक समाजातील नागरिकांचे सर्वोत्तोपरी रक्षण करणारे मन व मनातंर्गत विचार,भुमिका न्यायसंगत संवेदनशील असतील तर जबाबदार व्यक्तीत्व हे सर्व समाजाचा आधार बनतोय व सर्व नागरिकांच्या अंतकरणात आणि हृदयात स्थान निर्माण करतोय याकडे दुर्लक्ष होता कामा नये?

          तद्वतच अवैध व्यवसायिक हे सुद्धा आपल्या बाजूचे चेल्याचपाटे व दलाल तयार करु लागले असल्याचा नवीन प्रकार पुढे येवू लागला आहे.अवैध व्यवसायिक हे चेलेचपाट्यांच्या व दलालांच्या माध्यमातून आपले व्यवसाय सुरक्षित ठेवण्यात व स्वतःचे रक्षण करण्यात यशस्वी होत असल्याचा गंभीर प्रकार भंयकर आहे.

            अवैध व्यवसायिक व त्यांच्या चेलेचपाट्यांपासून आणि दलालांपासून पत्रकारांना,वार्ताहरांना नाहक त्रास झाला तर समाजाचे,समाजातील नागरिकांचे,लोकप्रतिनीधींचे,प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे,समजदार-जाणकार-अनुभवी व्यक्तीत्व आणि समाजसेवकांचे संरक्षण कोण करणार?हा प्रश्न जबाबदार शासकीय व प्रशासकीय यंत्रणेसाठी?

         म्हणूच बरबाद होणाऱ्या समाजासाठी जबाबदार व्यक्तींचे कर्तव्य काम करणार काय?