पोलीस पाटीलच्या मासिक सभेत उत्क्रुष्ट पोलीस पाटील म्हणून केला सत्कार…. — शेगावचे पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांचा उपक्रम… 

 

प्रमोद राऊत / तालुका प्रतिनिधी 

         पोलिस स्टेशन शेगाव बू. हद्दीतील पोलिस पाटील यांनी आज दिनांक 11 मे 2023 रोजी चे 11.00 वा ते 12.30 वा पर्यंत मासिक मीटिंग घेण्यात आली. पोलिस पाटील यांना गावातील वाद विवाद, जागा, शेती संदर्भात वाद असतील तर त्यांना आधीच भेटून त्याची माहिती घेऊन आम्हाला कळवावे, जेनेकरून आधीच त्यावर योग्य त्या उपाययोजना करता येईल, सीसीटीव्ही लावण्या संदर्भात तसेच इतर महत्वाचे मुद्द्यावर सूचना देण्यात आल्या. 

               एप्रिल महिन्यात उत्कृष्ट काम करणारे सुसा येथील पुरुष पोलिस पाटील ईश्वर जांबुळे आणि कोकेवाडा (मानकर) येथील महिला पोलिस पाटील यांना पुष्पगुच्छ, सन्मान पत्र आणि शिल्ड देऊन त्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच पोलिस स्टेशन शेगाव बू. येथील एप्रिल महिन्यात चांगले काम करणारे ग्रेड पीएसआय पीरके आणि पोलिस अमलदार राकेश तुरांनकर यांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि शिल्ड देऊन त्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

           पीएसआय पीरके यांचे 31 मे रोजी पोलिस दलातून रिटायर्ड होणार आहे. तरी सुद्धा सुट्टीवर न जाता पोलिस स्टेशनचे काम करतात. सर्वांना कामात मदत करतात, जे जिम्मेदारी दिली ते पूर्ण व्यवस्थित पार पाडतात. त्यांनी जास्तीतजास्त प्रतिबंधक कार्यवाही केल्यामुळे गुन्हाचे प्रमाण कमी झाले आहे.

           तसेच पोलिस अमलदार राकेश तुरांनकर हे पोलिस स्टेशन ला सर्वांना मदत करतात. त्यांच्याकडे पीएसआय सरोदे यांचा लेखनिक म्हणून जिम्मेदारी असली तरी ते सर्वांचे काम करून त्यांना दिलेले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असतात. असे यावेळी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी सांगितले.