प्रितम जनबंधु

संपादक

 

 दिं.१ सप्टेंबर २०२२

 

 चामोर्शी :- गौरीपुर येथे फुटबॉल प्रतियोगिता कार्यक्रमाचे शुभारंभ व उद्घाटन गडचिरोली चिमुर क्षेत्राचे खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते रीबिन कापून करण्यात आला.

 या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना खा.अशोकजी नेते यांनी गौरीपुर या गावी ही परंपरा ४० वर्षापासून चालू आहे. ही परंपरा टिकवणे गावावर अवलंबून आहे. अशा या प्रतियोगितेमुळे युवकांना उत्साह, आनंद तद्वतच प्रोत्साहन मिळतो. खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते. अशा फुटबॉल प्रतियोगिताचे आयोजन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन यावेळी खा.अशोकजी नेते यांनी केले.

 

फुटबॉल प्रतियोगिता कार्यक्रमाची सुरुवात खा.अशोकजी नेते यांनी रीबिनकापुन, श्रीफळ फोडून, राष्ट्रगीताने सुरू करण्यात आले.

 

या प्रतियोगितेमधे प्रथम पुरस्कार खा.अशोकजी नेते व सहकारी यांचे कडून ४०००१/- द्वितीय पुरस्कार डॉ. तामदेव दुधबळे माजी. जि. प. उपाध्यक्ष यांचे कडून २५००१/- व तृतीय पुरस्कार मुजुमदारताई व हदय बाला यांचे कडून १०००१/-रूपये पारितोषिक ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

 

 त्यावेळी खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य, आशिषजी पिपरे नगरसेवक तथा जिल्हा महामंत्री ओबिसी मोर्चा, शिल्पा रॉय जि.प.सदस्या, आशिष मुखर्जी सरपंच, महानंद हलदार उपसरपंच, रमेश अधिकारी सोशल मीडिया संयोजक, रेवनाथजी कुसराम पं.स.सदस्य तथा एस.टी मोर्चा संघटन, तरून गाईन तसेच अनेक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com