नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : साकोलीतील उसगांव, सोनेगाव, किन्ही/एकोडी, चिचटोला, सराटी, गुढरी, कोका ( तुमसर ), निपरटोला, मक्कीटोला, पळसपाणी, परसटोला आणि लाखनीतील केसलवाडा/पवार, सालेभाटा, मोरगाव या जंगलव्याप्त आदिवासी बहुल क्षेत्रासाठी हे मध्यवर्ती असलेले उसगांवतील ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालयामुळे या भागांतील अपंग विद्यार्थ्यांसाठी एक वरदान व नवसंजीवनी मिळणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सभापती गणेश आदे यांनी ( ता.३०.) उसगांव येथील ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलतांनी वक्तव्य केले. 

       ताजश्री बहुउद्देशिय ग्रामिण विकास संस्था उसगांव/चांदोरी अंतर्गत ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालयाच्या शुभारंभिय कार्यक्रमात पं.स.साकोली सभापती गणेश आदे, भावनेश डोंगरे , यशवंत वैद्य भंडारा, माधवराव येडे, किशोर बोपचे उपसरपंच, इंजि.मयुर घेटे, डॉ. इंद्रप्रसाद गणविर, अनिल बडवाईक, प्रा. सतिश बागडे, प्राचार्य पृथ्वीराज वैद्य, प्रा. अरूण आसटकर, पुंजराम कुटारे, अरूण हुमणे, प्राचार्य जानेश्वर येडे, संजय पाटील, सुशिल रंगारी, पोलीस पाटील विजया बिसेन, विनय वंजारी हे मंचावर हजर होते. ताजश्री बहुउद्देशिय ग्रामिण विकास संस्थेच्या वतीने हे आदिवासी व वन्यक्षेत्र परीसरातील मुकबधीर व मतिमंद विद्यालय सोयीस्कर सुविधायुक्तात होईल व शासनाच्या विविध कार्यकारी योजना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक बौद्धिक विकास साध्य करण्यासाठी हे ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालयाची स्थापना केली आहे असे संस्थेचे हार्दिक ठवरे यांनी सांगितले. कार्यक्रमात संचालन राजकूमार ठवरे यांनी तर आभार शोभा कुटारे यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com