रामदास ठूसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर :- गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे नुकताच विद्यार्थी संवाद उपक्रम कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक यशवंत शितोळे, अध्यक्ष माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र हे उपस्थित होते.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, मोबाईलचा योग्य वापर करण्याची पध्दत समजून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारी वेळ म्हणजे भांडवल होय. या भांडवलाचा करियरच्या दृष्टीने योग्य उपयोग करून घेतला पाहिजे.
विद्यार्थ्यांनी मोबाईल वरील ई- बुक वाचली पाहिजे. तसेच दररोजची वर्तमानपत्र वाचावी. करियर कट्टा उपक्रमाअंतर्गत उदयोजक आपल्या दारी व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की मोबाईल मध्ये करिअर घडू आणण्याची क्षमता आहे. मोबाइलचा योग्य वापर विज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी करून घ्यावा.
प्राचार्य अश्विन चंदेल यांनी आपल्या मार्गदर्शनात करिअर कट्टा या उपक्रमाचे महत्त्व सांगून त्यांनी करियर कट्टा विविध कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो हे स्पष्ट केले. प्रमुख अतिथी म्हणून सचिव प्रा.विनायकराव कापसे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ प्रफुल्ल बनसोड,मराठी विभाग प्रमुख डॉ. कार्तिक पाटील तसेच करिअर कट्टा प्रकाशन समिती सदस्या डॉ.शीतल लाखे या उपस्थित होत्या.
प्रास्ताविक उदयोजक आपल्या दारी करिअर कट्टा समन्वयक डॉ.राजेश्वर राहागंडाले तर आभार स्पर्धा परीक्षा करिअर कट्टा समन्वयक प्रा.पितांबर पिसे यांनी केले. या कार्यक्रमाला करियर कट्टा विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.