आरक्षण बचाव यात्रा 5 ऑगस्टला दर्यापूरात, नागरिक हक्क संरक्षण समितीचे आयोजन…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

           राज्यातील एस.सी, एस.टी.तथा ओबीसी, यांचे आरक्षण अबाधित रहावे. ह्या मागणी साठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून मागास प्रवर्गतील नागरिकांना आपल्या हक्काची जाणीव करुन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भर संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहेत.

           त्यातीलच एक भाग म्हणून आरक्षण बचाव संवाद यात्रा दर्यापुर येथे ५ ऑगस्ट रोजी येत असुन तिचे स्वागत व सभेचे आयोजन स्थानिक नागरिक हक्क संरक्षण समिती घ्या वतीने करण्यात येत असल्याची माहीती समितीचे अध्यक्ष ऍड संतोष कोल्हे यांनी समाज माध्यमाकडे दिली.

          दर्यापुर येथील अकोट रोड वरील माहेश्वरी भवन येथे सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले. असुन त्या सभेला ऍड बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करतील करिता नागरिकांना ह्या सभेला आवर्जून उपस्थित रहावे. असे आवाहन नागरिक हक्क संरक्षण समितीचे सचिव शरद रोहणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.