एक दिवस मोदी -शहा यांचा बेनिटो मुसोलिनी सारखा अंत होईल…. भाग – १…

       फॅसिस्ट विचाराचा मुसोलिनी आणि नाझी विचाराचा हिटलर या जोडगोळीने जगावर दुसरे महायुद्ध लादले.यांच्या शेवटातच युद्धाचाही शेवट झाला.संपूर्ण जगात पहिल्या महायुद्धापेक्षाही, दुसऱ्या महायुद्धातून वित्त आणि प्राणहानी कित्येक पटीने जास्त झाली होती.

          हे केवळ हिटलर आणि मुसोलिनी यांच्या असुरी महत्वाकांक्षेमुळेच घडले…..!

         शस्त्राच्या आणि संपतीच्या बळावर जग जिंकण्याचे प्रयत्न नेहमी अयशस्वी ठरतात.भलेही त्यांना असुरी आनंद मिळतही असेल,परंतू तो काही काळ असतो.जेंव्हा त्यांच्या अतीमहत्वाकांक्षेला शेवटची घरघर लागण्यास सुरुवात होते.तेंव्हा मात्र त्याला काळ सुद्धा क्षमा करत नाही.हा जगाचा इतिहास आहे.

             हिटलरची प्रेयसी असलेली इव्हा ब्राहू जी मृत्यूपूर्वी एक तास अगोदर एका बंकर मध्ये हिटलर सोबत लग्न करून सौभाग्यवती झाली.नंतर लगेच हिटलरने तिला सायनाईडची कॅपसूल देऊन संपवलं,त्यानंतर हिटलरने स्वतः डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.

         परंतू,मुसोलिनीला तर आत्महत्येची सुद्धा संधी मिळाली नाही.भर चौकात त्याच्या प्रेयसीला आणि त्याला उलटे केले व संपूर्ण नग्न करून फासावर लटकवण्यात आले होते.हा इतिहास अशा महत्वाकांक्षी हुकूमशहांचा आहे.

         अगदी त्याच पद्धतीने आमच्याही देशात मोदी – शहाची जोडगोळी याच मुसोलिनी – हिटलरच्या मार्गावरुन चालताना दिसत आहे.

              हिटलरने ज्या पध्दतीने सत्तेवर येण्यापूर्वी आपल्या देशवासियांच्या मनात घर केले आणि सत्तेवर विराजमान झाल्यावर प्रथम विरोधकांचे पंख छाटले.अगदी त्याच पध्दतीने मोदी – शहाच्या जोडगोळीनेही केले. 

          येथील काँग्रेस सारख्या मोठ्या विरोधी पक्षाचे पंख छाटले.त्यानंतर हिटलरने जनतेच्या मनात आपल्या भाषणातून पहिल्या महायुद्धात मित्रराष्ट्रानी जर्मनीवर कसा अन्याय केला.म्हणून आमचा देश आज भिकेला लागलेला आहे,हे पेरण्यास सुरुवात करून प्रथम जनतेच्या गळ्यातले ताईत झाला.

         इकडे सुद्धा मोदीने, आजपर्यंत काँग्रेस पक्षाने व त्यांच्या कार्यकाळात इतरांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा स्विस बँकेतून काढून आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले जातील असे खोटे आश्वासन दिले आणि हे महाशय सुद्धा जनतेच्या गळ्यातील ताईत बनले व प्रचंड बहुमताने 2014 ला प्रथम प्रधानमंत्री बनले.

         हिटलरने जगाचा बदला घेण्यासाठी जर्मनीची सर्व संपत्ती युद्धासाठी वापरली.या मोदीने सर्व संपत्ती भाजप व RSS साठी वापरली.काही तोडा फोडीच्या राजकारणासाठी वापरली.

         हिटलरचे ध्येय इंग्लंड, रशिया,अमेरिका,फ्रांस या पहिल्या महायुद्धातील शत्रूचा म्हणजे जर्मनीच्या अपमानाचा सूड उगवायचा होता.

         मोदीचे ध्येय काँग्रेस पक्षाला व त्यांच्या घटक पक्षाला कायमचे संपवून काँग्रेसमुक्त भारत करायचा होता….

          जागृतीचा लेखक

            अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर,7875452689…