नंदलाल पाटील कापगते विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा….

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

       साकोली – नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे आज दिनांक 1 जुलै 2024 ला शैक्षणिक वर्ष 2024 – 25 ला प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. 

        उन्हाळी सुट्ट्या असल्याने शालेय प्रांगणात शुकशुकाट निर्माण झालेला होता परंतु आज पासून शैक्षणिक सञाला सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा शालेय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजलेला होता. एखाद्या सणाची तयारी करावी त्याप्रमाणे शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी केली होती. शाळेच्या आवारात शिक्षिकांनी रांगोळी काढलेली होती.

         शाळेच्या आवारामध्ये मुख्याध्यापिका, प्राध्यापक, शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व पुष्पपाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत वर्ग 5 ते 8 च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात रॅली करण्यात आली.

        विद्यार्थ्यांच्या उत्साहाबरोबरच शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पहिल्याच दिवशी नवीन विद्यार्थ्यांची ओळख करून घेणे, त्यांना अभ्यासक्रमाची माहिती देणे असे नियोजन दिवसभरात झाले. 

        हे सर्व नियोजन मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. स्वाती गहाणे, प्रा. के.जी.लोथे, डी.एस. बोरकर ,एम.एम. कापगते, एस.व्हि. कामथे, आर.व्हि. दिघोरे, डी.आर. देशमुख, सोनाली क-हाडे व इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.