दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडूरंग नरवडे आणि राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून ते महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करीत आहेत.
आ.राजश्री मनोज गोंडाणे
जिल्हा सरचिटणीस..
याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मध्यमा मनिष सवाई व महाराष्ट्र राज्य सदस्या प्रा.भाग्यश्री एम.मेश्राम (फुलझेले) यांच्या सुचनेनुसार,महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी,”महाराष्ट्र राज्य सदस्यपदी आ.विजया राजेंद्र मोरे यांची नियुक्ती केली आहे तर गोंदिया जिल्हा सरचिटणीस पदी आ.राजश्री मनोज गोंडाणे यांची नियुक्ती केली आहे.
आ.स्वेता माधव मोटघरे
जिल्हा संघटक..
याचबरोबर गोंदिया जिल्हा संघटक पदी कु.स्वेता माधव मोटघरे यांची नियुक्ती केली तर गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष पदी आ.सुनिता धम्मदीप भोतमांगे याची नियुक्ती केली आहे.
आ.सुनिता धम्मदीप भोतमांगे
जिल्हा उपाध्यक्ष
सदर नियुक्तीचे सदस्यत्व व पदाधिकारी फार्म राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडूरंग नरवडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी पाठवले आहेत.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मनस्वी अभिनंदन सर्व स्तरावरुन होत आहे.