डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
अहेरी पंचायत समिती अतंर्गत येत असलेल्या राजाराम येतील जिल्हा परिषद केंद्र शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेश व पाठ्यपुस्तक व पुष्पगुच्छा देवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नवागता विद्यार्थ्यांचे पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यासहित अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, जि.प.सदस्य अजय नैताम,शाळा व्यवस्थापण समितीचे उपाध्यक्ष मीना सड़मेक,राजाराम ग्राम पंचायत,माजी सरपंचा जोतीताई जुमानके,माजी उपसरपंच संजय पोरतेट,महेश्वरी बत्तूलवार,सुरेश सोयाम,रमेश पोरतेट,अरविंद परकिवार,दिपक अर्का,नारायण चालुरकर,सतीश निष्टूरी,केंद्र प्रमुख पुसालवार सर,मुख्याध्यापक पस्पूनवार सर,ग्रामसेवक झाडे साहेब,शिक्षक श्री.जुमानके सर मडावी सर,चुदरी सर,आत्राम सरसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच विध्यार्थी उपस्थित होते.