वणी : परशुराम पोटे

 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी वणी, पंचायत समिती वणी व आत्मा यांच्या सयुक्त विद्यमानाने उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा श्री जगन राठोड यांचे मार्गदर्शनामध्ये दिनाक १ जुलै २०२२ ला हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन व कृषी संजीवनी मोहीमेचा • समारोप कार्यक्रम बि.आर. जी. एफ. सभागृह पंचायत समिती वणी येथे घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलभाऊ बलकी (अध्यक्ष तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती वणी), प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शरद जावळे (उपविभागीय अधिकारी वणी) व किशोर गजंलवार (गट विकास अधिकारी पं.स. वणी) तसेच सुशांत माने ( तालुका कृषी अधिकारी वणी) हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांनी दिनांक २५ जून ते ३० जून पर्यंत कृषी विभागामार्फत तालुक्यातील सर्व गावांमध्ये राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमाची माहिती दिली.तर डॉ शरद जावळे (उपविभागीय अधिकारी वणी) यांनी स्वताच्या शेतात आंबा फळपिकाची लागवड व विक्री बाबत माहिती सांगून शेतकर्यांनी फळ पिकाकडे वळावे व शेतीत उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक प्रगती करण्याचे उपस्थित शेतकर्यांना अवाहन केले.

गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी आधुनिक तंत्रज्ञान व पारंपारिक शेती याची सांगळ घालून शेती करण्याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी रस गावातील प्रगतशील शेतकरी श्री राजेश बेलेकर यांचा सत्कार व आत्मा अंतर्गत भाजीपाला पिक प्रात्यक्षिक चे बियाणे लाभार्थी शेतकर्याना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगलभाऊ बलकी (अध्यक्ष तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती वणी) यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये शेतकर्यांनी कृषि व सलग्न विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याबाबत उपस्थित शेतकर्यांना अवाहन केले. पिंपरी गावातील शेतकरी महेंद्र देवाळकर यांनी पोक्रा योजनेचा शेतकरी गटामार्फत कृषि औजारे बँक चा अनुदानावर लाभ घेऊन व त्याचा इतर शेतकर्याना उपयोग याबद्दलचे अनुभव कथन केले.

कार्यक्रमात तालुक्यातील आत्मा समितीचे सदस्य श्री विठ्ठल मालेकर, पुंडलिक आस्वले, मन्साराम गोहणे यांचे सह प्रगतशील शेतकरी, शेतकरी मित्र, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कु. समिक्षा वानखडे (कृषी अधिकारी), आनंद बदखल (मंडळ कृषी अधिकारी वणी), सुरेश पाझारे (कृषी विस्तार अधिकारी पं.स. वणी) कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मपाल बन्सोड ( तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक) यांनी तर आभार संजय वानखडे यांनी मानले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता तालुका कृषी अधिकारी कार्यालय वणी व पंचायत समिती वणी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com