दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

 

गडचिरोली–दि.०१ जुलै

 

       गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने वृक्षारोपण, फळवाटप व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

   शहरातील स्नेहनगर येथिल ओपन स्पेस मध्ये खासदार अशोकजी नेते,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा संघटन मंत्री रवींद्र ओल्लारवार,एस.टी. मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप,वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांना शाल वाटप करण्यात आले .

     तत्पुर्वी खासदार अशोकजी नेते यांना पुष्पगुच्छ देवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

      वरील सर्व कार्यक्रमाला माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, युवा मोर्चा शहर महामंत्री हर्षल गेडाम,सुभाष उप्पलवार,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,लता लाटकर, नीता उंदीरवाडे,रोशनी बानमारे,निलिमा राऊत,पुनम हेमके,कोमल बारसागडे,ज्योती बागडे,राजू शेरकी,देवाजी लाटकर,विलास नैताम तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com