अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जाणून घेतल्याशिवाय मानसाला स्वतःचे अस्तित्व कळत नाही,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्ताने प्रदीप रामटेके यांचे प्रतिपादन… — विविध स्पर्धा अन्वये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धकांना वितरण.

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका 

   महामानव,युगप्रवर्तक,युगपुरुष, जगविख्यात प्रकांड पंडित तथा अर्थतज्ज्ञ,बोधिसत्व,डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशातंर्गत समस्त मानव कल्याणाची सर्व प्रकारची सर्वोत्तोम क्रांती होय..

       तद्वतच महामानवाच्या परिवर्तनीय वैचारिक,सामाजिक,आर्थिक, राजकीय,शैक्षणिक,धार्मिक क्रांती अंतर्गत सर्व प्रकारचा मानव विकास केंद्र होय.

           अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्यात समता,स्वातंत्र्य,बंधुत्व,न्यायाचे, चारित्र्य समावलेले असून शोषणा विरुद्धचे बंड आहे.यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परिभाषा समजून घेतल्याशिवाय मानवाला त्याच्या अस्तित्वाची खरी जाणीव होत नाही,अशा प्रकारचे प्रतिपादन अध्यक्षीय मार्गदर्शनातंर्गत प्रदीप रामटेके यांनी कोलारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमानिमित्ताने केले.

          चिमूर तालुक्यातंर्गत मौजा कोलारी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.सदर जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके हे होते.

 

      तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबोली येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव ठाकरे,कोलारी ग्रामपंचायतचे सरपंच राजू अलोणे,कोलारी येथील माजी सरपंच सौ.प्रज्वलाताई बं.गावंडे,माजी सरपंच सौ.लिलाबाई ना.अलोणे,माजी सरपंच जाणबा अलोणे,ग्रामपंचायत सदस्य नितीन अलोणे,सौ.बेबीताई कार्तिक पिल्ले मुंबई,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.एम.मानकर, साहाय्यक शिक्षक एस.सी.डफरे,अमोल लोकवरे, अंगणवाडी सेविका बेबीताई काटेकर,श्रीमती येणूताई कडू,सि.आर.पी.दुर्गा काटेकर,कृषीसखी विजया गजभिये,पशुसखी सुरेखा जांभुळे,किशोर गावंडे,तुमसे अध्यक्ष बाळकृष्ण माळवे व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक होते.

         दिप प्रज्वलन करून लार्ड तथागत भगवान गौतम बुद्ध,रयतेचे समताधिष्ठित न्यायप्रविष्ठ छत्रपती शिवाजी महाराज,सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, युगप्रवर्तक – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्रिवार वंदन करण्यात आले.

         यानंतर कुमारी प्रतिमा गजभिये,कुमारी प्रतिक्षा अलोणे,कुमारी काजल मेश्राम,कुमारी कशिश गजभिये,कुमारी कल्याणी मेश्राम यांनी,–“इतिहासाचे रंगरुप आले या नगरात,स्वागत-सुस्वागत हा मानाचा मुजरा,हे स्वागत गित सादर करुन मान्यवर पाहुण्यांचे आदरभावाने स्वागत करण्यात आले. 

       कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी ओबीसी समाज व त्यांचे भारत देशातील अस्तित्व काय?यावर भाष्य करीत, डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व जनहितार्थ महत्त्वपूर्ण अशा महान कार्यावर मुद्देसूद मांडणी केली.

      याचबरोबर आंबोली येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव ठाकरे,कोलारी ग्रामपंचायतचे सरपंच राजू अलोणे,एस.एम‌.डफरे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले.

       विविध स्पर्धा अंतर्गत प्रथम,द्वितीय,तृतीय,चतुर्थ स्थान पटकावणाऱ्या स्पर्धकांना देवेंद्र मेश्राम यांच्या कडून मान्यवरांच्या हस्ते,”शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणानी केला, विलास खरात लिखीत पुस्तक देण्यात आले.याचबरोबर पद्मदिप अलोणे यांच्या कडून मेडल व समाज बांधवांकडून ट्राफी आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश अलोणे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी युवा पदाधिकारी व बौद्ध समाज बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले.