संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत
साकोली -साकोली येथील फ़्रिडम युथ फाऊंडेशन ही संस्था तरुणांना प्रेरणा देणारी एक संस्था आहे. ही संस्था नव-नवीन उपक्रम तरुणांना साठी घेऊन येते. अशीच एक नवीन उपक्रम त्यांनी हातात घेतले आहे. वाढत्या महागाई मुळे गरीब गरजू मुलांना शालेय वस्तू घेणे अवघड झाले आहेत. त्याची परस्थिती लक्षात घेऊन फ़्रिडम युथ फॉउंडेशन “मदत आमची, शिक्षण तुमचे!”या उपक्रमाचा नियोजन करण्यात आलं.अश्या वेळी सामाजिक सेवक म्हणून आशिष गुप्ता यांनी हात पुढे केल व गरीब व गरजू विद्यार्थी यांना मदत केली. त्यानी मुलांना बुक, पेन, व शालेय उपयोगी वस्तू त्यांनी आपल्या कडून भेट दिली.फ़्रिडम युथ चे अध्यक्ष किशोर बावणे यांनी सांगितलं की काही मुलांची परिस्थिती इतकी हालकाची आहे की ते शालेय लागणारे उपयोगी वस्तू घेणं त्यांना अवघड आहे. की ते घेऊ नाही शकत. अश्या वेळेस आपण त्यांना काय मदत करू अस त्याचा मनात आलं व त्यांना ही एक कल्पना सुचली की जे मदत मिळेल ते आपण त्यांना देऊ.म्हणून या उपक्रमाचं उद्देश हा आहे की “मदत आमची, शिक्षण तुमचे!”मदत आम्ही करू तुमी फक्त आपले शिक्षण पूर्ण करा. या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळ्याचे मुख्याध्यापक वलथरे सर, शिक्षणगण बागडे सर, दुपारे सर, पटले सर, बोकडे सर, कार्तिक सर, आणि फ़्रिडम चे सागर पुस्तोडे,कार्तिक लांजेवार, स्वामी नेवारे, समीर सूर्यवंशी, स्वनील गजभिये, शुभम शेंदरे, दुर्गश पुशराम, रवी मेश्राम, मयूर सोनवणे, दीपिका दिघोरे, आचल वालोदे, तनिष्का वालोंदे, सिमरण व समस्त फ़्रिडम युथ फॉउंडेशन चे सदस्य उपस्थिती होते.