ऋषी सहारे
संपादक
कोरची – पंचायत समिती कोरची येथे महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत सरस्वती स्वंय सहाय्यता समुह कोचीनारा यांचे वतीने कॉप शॉप ला सुरुवात करण्यात आली आहे . याचे उद्घाटन गट विकास अधिकारी राजेश फाये यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन कृषी अधिकारी रेणु दुधे , पं.स. चे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुचिता ऑस्कर , सितल साळवे , विस्तार अधिकारी देवानंद फुलझेले , लेखा अधिकारी हकीम , स्था अभियांत्रीकी सहाय्यक दिगांबर पेंटेवार प्रभाग समन्वयक विनोद गडपायले , प्रभाग समन्वयक जसविंदर शहारे , नितीन नैताम , किशोर मारगाये , प्रविन लाटकर आदि उपस्थित होते . प्रधानमंत्री आवस योजने अंतर्गत पंचायत समिती स्तरावर डेमो हाऊस चे बांधकाम करण्यात आले होते . सदर डेमो हाऊस हे स्वंय सहाय्यता समुहांना रोजगाराकरीता उपलब्ध व्हावे या अनुषंगाने सदर डेमो हॉऊस कोचीनारा येथील सरस्वती समुहाला उपलब्ध करुन देत या ठिकाणी समुहाच्या माध्यमातून कॉप शॉप सुरु करण्यात आले आहे .. या प्रसंगी सदर समुहातील संपूर्ण महिला व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते .