पुणे जिल्हा प्रतिनिधी
वारजे:- गोकुळ नगर पठार येथे संसद रत्न पुरस्कार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशन या शाळेत आगळंबे गावचे उपसरपंच रघुनाथ ठाकर यांच्या वतीने मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
नियोजन उपसरपंच रघुनाथ ठाकर ॲड.रामचंद्र कर्डिले सौ.निलम नारायण डोळसकर,यशवंत एज्युकेशन सोशल फाऊंडेशन शाळेच्या वतीने सामाजिक काम केल्याबद्दल रघुनाथ ठाकर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . सर्व शाळेतील मुलांना पुस्तक वह्या देऊन सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.