सावली (सुधाकर दुधे)

 

पोलिस स्टेशन सावली अंतर्गत 

 येत असलेल्या रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे आज दि. 01/07/22 रोजी भेट देवुन विद्यालयातील वर्ग 5ते 10वर्गातील एकुण 500 विद्यार्थी विद्यार्थिनींना अमली पदार्थ विरोधी सप्ताह दिन व आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे अनुषंगाने, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम संबधाने बालकांना,पालकांना तसेच शिक्षकांना घ्यावयाची काळजी व उपाय,गुड टच, बँड टच ची माहीती,अमली पदार्थ सेवन त्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच सायबर क्राईम तसेच मोबाईल द्वारे आमिष दाखवून मुलांकडून होणारी फसवणुक याबाबत माहिती देवुन मार्गदर्शन केले, अल्पवयीन मुलं-मुली पळून जाणे, या विषया संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले,

           सदर कार्यक्रमास पोलीस स्टेशनं सावली ठाणेदार श्री आशिष बोरकर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्री शेंडे ,चहांदे मॅडम यांची प्रमुख उपस्थीती होती तसेच पो. स्टे सावली चे अंमलदार मोहन दासरवार व विद्यालयाचे संपुर्ण शिक्षक व कर्मचारी उपस्थीत होते. 

पोलीस स्टेशन सावली कडून वरील विषयांवर सतत जनजाग्रुती करुन करुन मार्गदर्शन देण्यात येत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News