सावली : (सुधाकर दुधे)

 

              केंद्र सरकारने कंत्राटी पद्धतीने भारतीय सैन्य दलात भरती करिता अग्निपथ योजना आणली असून याद्वारे केवळ चार वर्षेकरिता तरुणांची भरती होणार आहे. यानंतर तरुण बेरोजगार होणार आहे. सैन्य दलातून निवृत्ती नंतर या तरुणांना कोणतीही पेन्शन मिळणार नाही. यामुळे तरुणाचे आयुष्य अंधकारमय होईल. सदर योजनेमुळे सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नैराश्य पसरले आहेत. याकरिता सदर योजनेला देश भरातून विरोध होतं आहे. 

             दि. ३० जुन रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनातुन “अग्नीपथ योजना बंद करण्यासाठी” मा.ना. विजय भाऊ वड्डेटीवार जनसंपर्क कार्यालय सावली येथून शांती मोर्चा काढण्यात आला. देशातील युवकांना देशोधडीला लावण्या करिता , देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने अग्निपथ योजना लोकसभेत पारित करून सुरु करण्याचे योजिले आहे. या योजने नुसार १९- २३ या वयोगटातील मुला-मुलींची केवळ ४ वर्षा करिता देशसेवेसाठी निवड होणार आहे व त्यापैकी २५% युवकांना नंतर स्थायी नोकरी करणार आहेत. पण ४ वर्षे सेवा करून जे अग्निवीर निवृत्त होतील , ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले नाही किंवा ज्यांची परिस्थिती खराब , गरीब आहे ते युवक युवती नंतर भरकटल्या जातील , ज्यांचा जवळ रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसतील. त्यातल्या त्यात त्यांना पेन्शन सुद्धा मिळणार नाही. एकंदरीत ज्यांनी देशसेवेचे व्रत घेतले , अपार कष्ट आणी आपल्या प्राणाची पर्वा न करणारे अग्निवीर या योजनेनुसार त्यांचे जीवन अंधारमय व नैराश्यपूर्ण जीवनाकडे वाटचाल करतील , देशाचे उज्वल भविष्य धोक्यात येईल.

                           आजचा तरुण हा भविष्यातील आण-बाण-शान आहे , जर या देशातील युवक बेरोजगार आणी नैराशात जीवन व्यथित करतील तर देश पूर्णपणे विस्कटीत होईल आणी अधोगतीकडे वाटचाल करेल हे सर्व संकटे रोखण्यासाठी ही योजना बन्द करण्यात यावी. आज देशात या योजने विरुद्ध जन सामान्यात आक्रोश व नाराजी दिसून येत आहे. तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी व देशाचा सर्वांगीन विकासाठी ही अग्निपथ योजना त्वरित बंद करण्यात यावी या करिता सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारताचे महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांच्या कडे मा. श्री. परीक्षित पाटील, तहसीलदार साहेब सावली यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. 

                 यावेळी नितीन गोहणे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सावली व मा.सौ. उषाताई भोयर तालुकाध्यक्षा महिला कॉंग्रेस कमिटी सावली तसेच नगर पंचायत सावली चे नगराध्यक्षा सौ. लता लाकडे , उपनगराध्यक्ष श्री. संदीप पुण्यपकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्री. विजय जी कोरेवार , काँग्रेस चे ज्येष्ठ नेते अनिल स्वामी , अनिल गुरुनुले , सचिन इंगुलवार, शरद कन्नाके, पुरुषोत्तम चुधरी , किशोर घोटेकर, श्रीकांत बहिरवार, किशोर कोरडे, दिलीप लटारे, नगरपंचायत सावली चे नगर सेवक- नगर सेविका या वेळी उपस्थित होते. त्यात सौ. साधना वाढई, गुणवंत सुरमवार, प्रीतम गेडाम, अंतबोध बोरकर, सौ. सिमा संतोषवार, सौ. प्रियांका रामटेके, सौ. ज्योती शिंदे, सौ. ज्योती गेडाम, सौ. अंजली देवगडे, आणी सावली तालुका महिला कॉंग्रेस कमिटीचे सौ.कविता मुत्यालवार, काँग्रेस महिला शहर अध्यक्ष सौ.भारति चौधरी, सौ. शिला गुरुनुले, चांदणी मडावी, सौ. अंजली दमके, सौ. भावना बीके, योगिता बुडगलवार, ज्योती बहिरवार, संगीता गेडाम, निता दांडिकवार आणि समस्त महिला काँग्रेस कमिटी उपस्थित होते. यावेळी सोशल मिडीया चे संयोजक सुरज गुरुनुले , विधानसभा उपाध्यक्ष मृणाल गोलकोंडावार आणि कमलेश गेडाम तालुकाध्यक्ष सोशल मिडीया सेल व रविद्र घोगरे, निलेश राऊत, पुरषोत्तम भोपये, वामन चौधरी आदी मान्यवर महोदय यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com