संजय टेंभूर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
दि.३०जुन२०२२ला संताजी मंगल कार्यालय साकोली येथे कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी अधिकारी एस.ए.ढवळे, प्रशिक्षण मार्गदर्शक अनिल किरणापुरे युवा शेतकरी,यादव जी मेश्राम कृषी भूषण शेतकरी,आर.आर डोंगरे कृषी अधिकारी,भगीरथ सपाटे कृषी अधिकारी ,रंजु अनित्य विस्तार अधिकारी कृषी,छाया कापगते कृषी अधिकारी, दीप्ती खुपसे , कटरे सर , रजंनी टेंभुर्ण आत्मा व आत्मा शेतकरी गट, शेतकरी, महिला शेतकरी उपस्थित होते.”मार्गदर्शन करते वेळी अनिल किरणापुरे सांगितले की, शेतात पिकांची लागवड करतानी बाजारपेठ लक्षात घेऊन पीक लागवड करावी. कोणत्या महिन्यात कोणत्या पिकांची जास्तीत जास्त मागणी असते असे पीक लक्षात घेता पिकांची लागवड करावी,शेताला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यवसायीक दृष्ट्या बघावे पिकांची लागवड पूर्वतयारी महत्त्वाची असते माती परीक्षण ,पाणी, खते,औषधी , बदलत्या हवामाना नुसार पीक बदल होत असतात तेव्हा रोगांचा प्रादुर्भाव जास्त होते अशावेळी रोगांचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते बोलत होते.,”
“अध्यक्षीय भाषणात एस.ए.ढवळे सांगितले की,आपण सर्व शेती करतो पण शेती कशी करावी हेच आपल्याला माहित नाही . शेती आधुनिक पद्धतीने केली पाहिजे,शेतीला लागणाऱ्या सर्व तंत्रज्ञान महाडीबीटी वर अर्ज करून योजनेच्या लाभ घ्यावा असे ते सांगत होते. ” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी टेंभुर्ण ,आभार छाया कापगते यांनी केले.