संजय टेंभूर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
शेतीला पूरक व्यवसायाची काळाची गरज.अनिल किरणापुरे पं.स.सदस्य
मौजा. लवारी येथे 30 जून 2022 ला ग्रामपंचायत लवारी मध्ये संजीवनी मोहीम अंतर्गत शेती पूरक व्यवसाय विषयावर मुख्य मार्गदर्शक अनिल किरणापुरे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डि.एन.शेन्डे कृषी अधिकारी,वाय.डी. मेश्राम कृषी भूषण शेतकरी, आर.एम.ग्राम विस्तार अधिकारी , कृषी सहाय्यक कुंदा परशुरामकर व उपस्थित शेतकरी सुरेश गोटेफोडे,केशव लांजेवार ,गजानन किरणापुरे, आनंद कापगते ,मारुती गोटेफोडे, आनंद मेश्राम ,विश्वनाथ कापगते, विलास कापगते, विलास नगरीकर व समस्त गावकरी बांधव उपस्थित होते मार्गदर्शन मध्ये अनिल किरणापुरे यांनी सांगितले की, शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसाय केलं पाहिजे उदाहरणार्थ शेळीपालन, कुक्कुटपालन ,गो-पालन ,दुध्द व्यवसाय, मत्स्यपालन, इत्यादी व्यवसाय आहेत कोणतेही व्यवसाय करत असताना त्याच्याबद्दल सखोल माहिती घेऊन व्यवसाय सुरू केलं पाहिजे व्यवसाय करताना कमीत- कमी कॉन्टेटी पासुन सुरुवात करावे. व्यवसाय करताना पाणी व्यवस्थापन,खाद्य व्यवस्थापन, लसीकरण , बाजारपेठ,इत्यादी गोष्टी कडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागते. तसेच शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीत भात पिक वगळता बागायती शेतीकडे लक्ष देवुन आतंर पिकांची लागवड करावी असे ते बोलत होते.