ऋषी सहारे
संपादक
एकीकडे सरकारने गोवंश तस्करी व गोवंश हत्येवर बंदी घातली असली तरी छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या कोरची तालुक्यातून गोवंशाची तस्करीचा मुख्य अड्डा तयार केला असून कोरची तालुक्यातून होणारी गोवंशची तस्करी तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक गावतुरे यांनी केला असल्याचे कळते.
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या कोटरा,खुर्शीपार,हेटाळकसा ,बोरी,घुगवा,बोटेकसा या ठिकाणावरून ‘मध्यरात्री कत्तलीसाठी दररोज पाच ते सात ट्रक भरून गोवंशची तस्करी केली जाते.
कोटरा ,खुर्शीपार ,हेटाळकसा ,बोरी,घुगवा,बोटेकसा,हितापाळी, हे गाव तालुक्यातील काही गोवंश तस्करांसाठी केंद्रबिंदू बनले आहे. या ठिकाणावरून नागपूर जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात व तेलंगणा राज्यात जनावरांची तस्करी केल्या जाते. तहसील मुख्यालयापासून काही अंतरावर गोवंश विक्री व तस्करीचा हा गोरखधंदा सुरू असूनसुद्धा पोलीस विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्याच्या उत्तर दिशेला असलेल्या कोरची तालुक्याचा मागील दोन वर्षांपासून सर्वात जास्त गोवंश तस्करीच्या घटना कोटरा खुर्शीपार हेटाळकसा बोरी, घुगवा,बोटेकसा, येथेच उघड झालेल्या आहेत.
त्यामुळे हे प्रकरण समोर आले होते. परंतु काही दिवसापासून पुन्हा त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोरची पोलीस त्यापासून अनभिज्ञ च आहेत, की त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप अशोक गावतुरे यांनी केला असल्याचे समजते .
घटनास्थळी बघितले असता त्या ठिकाणी ३-४ जागेवर झाडांना गोलगोल मोठमोठे दोर बांधले आहेत.२०० ते ३०० जनावरे राहू शकतात, इतके मोठे गोठे तयार करण्यात आले आहेत. कोटरा वरुन दोन किमी अंतरावर जंगलात हुपुंडी यांच्या शेताजवळ एक ट्रक व २०० ते २५० गाई बैल बिना चाऱ्या पाणी ने बांधुन आढळले या ठिकाणी कोटरा येथील कोवाची १८ वर्षांचा मुलगा २०० रुपये रोजी ने परिसरातील जमा केलेले गुरांना राखन करीत असते या मुलांला अधिक माहिती विचारली असता कोरची व चिचगड पोलीस स्टेशन अधिकारी पण काही करीत नाही,पावसाळ्यात चार महिने सुरू होते आता चार एप्रिल पासून या ठिकाणी अडा सुरू आहे असे सांगितले तर दर दोन तिन दिवसांत चार ते पाच ट्रक जनावरे नागपूर, हैदराबाद ला पाठवले जातात मिसपीरी येथील अमीत वालदे हे परिसरातील जनावरे गोळा करून ठेवता तर सदू कुरेशी नागपूर हे नागपूर हैदराबाद ला तस्करी करणाऱ्या येतात गडचिरोली जिल्ह्यातील बेडगाव, पुराडा, कुरखेडा, देसाईगंज हे पोलीस स्टेशन पार करून जनावरे नागपूर हैदराबाद ला तस्करी होते कशी असा प्रश्न गावतुरे यांनी उपस्थित केला आहे.