ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या श्याम शुश्रृषा रूग्णालय गणेश वार्ड साकोली, स्थापना १९७४ – ते – २०२४ या रूग्णालयाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शनिवार ०१ जून २०२४ ला गणेश वार्डातील या रूग्णालयात विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यात मुख्य साकोली शहरातील व परीसरातील जनतेने एवढ्या उन्हाची तमा न बाळगता मोफत आरोग्य शिबिरात येत एकुण १२७ रूग्णांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला हे उल्लेखनीय.
स. ९ ते दु. १ पर्यंत झालेल्या आरोग्य शिबीराचे उदघाटन मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून केले.याप्रसंगी डॉ. वा. म. लंजे, डॉ. रूपेश बडवाईक व डॉ. सुधाकर लांजेवार यांनी उपस्थित राहून आरोग्य सेवा प्रदान केली. शिबिरात विविध आरोग्य तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी केली गेली. येथे जनरल फिजीशिएन डॉ. रविंद्र कापगते, डॉ. हेमकृष्ण कापगते, स्त्री रोग तज्ञ डॉ. छाया आर. कापगते, होमिओपॅथी तज्ञ डॉ. भानुदास कापगते, बालरोग तज्ञ डॉ. आलोक कापगते, दंतरोग तज्ञ डॉ. शितल भुरे, नेत्र चिकित्सक डॉ. राहुल ब्राह्मणकर यांनी शिबिरात रूग्णांना मोफत आरोग्य सेवा दिली.
तर यात संयोजक ॲड. मनिष कापगते, सौ. शकुंतला कापगते, विवेक कापगते, सौ. देवश्री कापगते यांचे होते.
यामध्ये आरोग्य सेवा आयोजक – मोरेश्वर गहाणे, राजू कापगते, मधुकर नगरकर, शुभम खांडेकर, अश्विन रंगारी, भागवत लांजेवार, अंकीत गहाणे, युवराज गहाणे, बलराज नंदेश्वर ( प्रतिक मेडीकल साकोली ), मिन्नाथ लांजेवार, मनिषा काशिवार, रवि भोंगाणे ( पत्रकार ), होमेश गहाणे यांनी अथक परिश्रम घेतले.