उमेश कांबळे ता प्र भद्रावती :-
बुद्धीबळ हा बुद्धीचा क्रीडा प्रकार आहे.त्या मध्ये स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवून आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक अपयशावर मात करून टिकुन राहण्यासाठी व बुद्धीच्या जलद व सर्वांगीण विकासासाठी बुद्धीबळ खेळ आवर्जुन खेळावा असे आव्हान असोसिएनचे अध्यक्ष पांडुरंगजी सोमाजी आंबटकर यांनी स्पर्धा उदघाटन प्रसंगी केलेले आहे.
भद्रावती तालुका क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट व मायक्रुन स्टुडंन्ट्स अकादमी , सुमठाणा, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 30 एप्रिल 2023 रोज रविवार ला मायक्रुन स्टुडंन्ट्स अकादमी, सुमठाणा,भद्रावती येथे प्रथम जिल्हास्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धा लाउस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाल्या .
या बुद्धीबळ स्पर्धा चे उदघाटन पांडुरंग सोमाजी आंबटकर (अध्यक्ष – अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी .प्रा.सेन्सई दुष्यंत नगराळे सर( अध्यक्ष – अमेचुर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट), आशुतोष गयनेवर (अध्यक्ष – चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुर जिम्नॅस्टिकस असोसिएशन), ऍड. राजरत्न पथाडे(अध्यक्ष- फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट),डॉ. अंकुश आगलावे ( अध्यक्ष – एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल, चंद्रपुर डिस्ट्रिक्ट), राजदा सिद्दीकी ( प्रिन्सिपल-मायकरून स्टुडंन्ट्स अकादमी), अजय पाटील ,ऍड. मनीषा पथाडे,अलका मोटघरे (संस्थापक सचिव रोप स्किपिंग असोसिएशन,चंद्रपूर ),ऍड.मलक शाकिर, ऍड. अमर फुलझले इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व विजेत्या स्पर्धकांना एकुण 37 हजार 500 रुपये चे नगद पुरस्कार व भव्य आकर्षक ट्रॉफी व मेडल ने सम्मानीत करण्यात आले .
या स्पर्धेत 177 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सर्व सहभागी स्पर्धकांना जिल्हा चेस असोसिएशन द्वारा प्रावीण्य व सहभाग सर्टिफिकेट देण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी अयोजनाकरिता स्पर्धा संयोजक रेंशी दुर्गराज एन रामटेके (संस्थापक व सचिव – अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट ) आयोजन समितीचे प्रमुख प्रा.दुष्यंत नगराळे व सुरज जयस्वाल , पांडुरंग भोयर, अतुल कोल्हे, बंडू करमनकर, ऍड. विना बोरकर,किशोर गोटमारे,श्रीहरी गॅसकांटी ,संजय सिंग , सुधीर माथेरे , मिलिंद वाघमारे , अजय पाटील , संजय माटे , उलफतद्दीन सय्यद , मनिष भागवत ,बंडू रामटेके, विकास दुर्योधन,आशिष चुनारकर, गोपाल कळमकर ,महेंद्र मेश्राम, करण डोंगरे , संदीप पंधरे,किशोर झाडे ,आनंद डांगे , व समस्त पदाधिकारी अमेचुर बुद्धीबळ असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट यांनी अथक परिश्रम घेतले आहे.