इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आयोजित साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी-देहूच्या कुशीतून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला वारकऱ्यांच्या मनात अतिशय पवित्र स्थान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत इंद्रायणीचे प्रदूषण चिंतेचा मुद्दा झाला आहे. इंद्रायणी नदीत कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी, महापालिका, नगरपरीषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीतील मैलायुक्त पाणी‌ सोडल्याने इंद्रायणी नदीत अतिशय प्रदूषण झाले आहे.हे सर्व रोखण्यासाठी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्र दिनी आळंदी येथील माऊली मंदिराजवळ महाद्वार चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाला आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे, प्रवक्ते आरिफ शेख, युवक अध्यक्ष सौरभ गव्हाणे, सतीष कुऱ्हाडे, निसार सय्यद, गणेश तोडकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.