विवेकानंद महाविद्यालयात कौशल्य विकास विभागाचे उद्घाटन..

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती : 

               देश २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येकाच्या अंगी किमान कौशल्ये असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी किमान कौशल्ये आत्मसात करतील तेच पुढील स्पर्धेत पुढे टिकतील. जे आळस करतील ते स्पर्धेच्या बाहेर पडतील. म्हणून आपल्या सुवर्णमय भविष्यासाठी प्रत्येकाने किमान कौशल्ये आत्मसात केले पाहिजे व आपली गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे असे विचार पत्रकार सुनील पतरंगे यांनी व्यक्त केले.

          ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील किमान कौशल्य विभाग द्वारा आयोजित उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. उद्घाटक प्रियदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रवीण बाळसराफ, पत्रकार सुनील पतरंगे व किमान कौशल्य विभागाचे समन्वयक डॉ. सुधीर आष्टुनकर व्यासपीठावर उपस्थित होते.

         यावेळी बोलताना प्राचार्य बाळसराफ यांनी सांगितले की, भविष्यकाळाची नादी लक्षात घेत शासनाने नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा संकल्प केलेला आहे. काळानुसार विद्यार्थ्यांनीही बदलणे आवश्यक आहे. नवनवे कौशल्ये आत्मसात करून जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकले पाहिजे असे मत व्यक्त केले. 

          विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या विभागाचे उद्घाटनपर कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुधीर आष्टुनकर, आभार सहसमन्वयक प्रा.नरेंद्र लांबट यांनी केले. 

         यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.