निरा नदीचे पात्र व बंधारे कोरडे पडल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर पाण्याचे संकट… — पाण्याविना शेत पिके जळू लागली…

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

 

भीमा नदी तुडुंब भरून वाहते तर नीरा नदी पूर्ण कोरडी पडलेली आहे.शेतकऱ्यांची पिके जळाल्याने बळीराजा अडचणीच्या संकटात असल्याने,नीरा नदीला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्याची मागणी.

           भिमा नदी पात्र भरून वाहत आहे व निरा नदीचे पात्र कोरडे तर बंधारे देखील कोरडी नदी पाण्याविना ओसाड दिसू लागली.

         कोरडे पात्र बघून शेतकरी बळीराजा करणार काय, कर्जाचा डोंगर असल्यामुळे शेतकरी मेटा कुठी आला.

           मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने इंदापूर तालुक्याच्या गिरवी गोंदी लुमेवाडी,लिंबोडी , सराटी या भागात पाणी टंचाईचा प्रश्न आनेक दिवसापासुन शेतकरी व नागरिकांना सतावत आहे.या भागात शेतीसाठी, पिण्यासाठी आणि जणावरांसाठी लागणार्‍या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.

          तालुक्यातील पश्चिम भागाची जिवनदायीनी समजली जाणारी निरा नदी यावर्षी दोन महिने अगोदरच आटली असुन नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले आहे.निरा नदी आटल्याने निरा नदीच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या इंदापूर व माळशिरस भागातील शेतकर्‍यांची पिके पाण्याविना जळु लागल्याने शेतकरी पुरता खचुन गेला आहे.

       तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकर्‍यांचे ऊस हे प्रमुख पिक असुन गहु,मका, डाळिंब, पेरू भुईमग,केळी,यासारखी आनेक हाता तोंडाला आलेली नगदी पिके पाण्याविना जळु लागली आहेत.निमसाखर पासुन ते नरसिंगपूर या पट्यात निरवांगी, दगडवाडी, खोरोची, सराटी, बोराटवाडी, निमसाखर,चाकाटी,लुमेवाडी,निंबोडी,तसेच माळशिरस तालुक्यातील तांबवे,पळसमंडळ, अकलुज,माळिनगर सह जवळ जवळ तीस ते पस्तीस गावातील शेतकर्‍यांसमोर निरा नदीचे पाणी आटल्याने पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

             महाराष्ट्र शासनाने या वर्षी इंदापूर तालुका दूष्काळग्रस्त तालुका म्हणुन जाहिर केलेला आहे.आग ओकर्‍या कडक उन्हाच्या तिव्र झळा आणी पाण्याविणा डोळ्यासमोर जळणारी पिके तसेच वाढता कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

           निरा नदीच्या पात्रात आनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधलेले आहेत.परंतु सर्व बंधारे आटुन गेल्याने जणावरे,पशु पक्षी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असताना दुष्काळग्रस्त तालुका जाहीर होउनही शासन स्तरावरून कसलीही मदत शेतकर्‍यांना मिळत नाही.शेतकर्‍यांना पिण्यासाठी पाण्याचे टँकर सूरू करण्याची मागणी करून देखील पाण्याचे टँकर सुरू होत नसल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे.