
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथुन जवळच असलेल्या म्हसली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक नारायण उताने हे नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले.
शाळेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी संकेत सोनवाने सरपंच,सौ. चारुशीला कावरे उपसरपंच, मुख्याध्यापक खेडझरकर, पोलिस पाटील श्रीराम धारने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिश्चंद्र सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य पद्माकर पेंदाम,सौ.अश्विनी धारने,सौ.मंगला देवतळे,सौ.मयुरी ढोले मॅडम,शिक्षक प्रशांत तडस,सौ.मनिषा आष्टनकर मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
उताने शिक्षक यांना सेवानिवृत्तीनंतरच्या काळात उत्तम आरोग्य लाभो अश्या सदीच्छा व्यक्त करण्यात आल्या.