हत्तीगोटा (खातोडा) परिसरात वाघाचा धुमाकूळ… — वाघाचे दर्शन दररोज होत असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गात भितीचे वातावरण.

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी  

 चिमूर तालुकातंर्गत खातोडा-वडसी परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून,वाघ भर दुपारी शेतात काम करीत असलेल्या शेतमजूराना दिसत असल्याने वडसी,खातोडा परीसरात वाघांची दहशत निर्माण झाली आहे.यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

        वडसी – खातोडा परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून या परिसरात पट्टेदार वाघाचे दररोज दर्शन होत असल्याने शेतात काम कसे करावे अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

         याचबरोबर शेत शिवारात पट्टेदार वाघ दिसत असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

       या परिसरात वन्य प्राण्यांच्या अधिवास वाढला असून वाघाचे दर्शन नेहमी होत आहे.वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.