
दखल न्यूज भारत नेटवर्क…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊ साठे यांनी अर्पण केलेल्या फकिरा कादंबरीचा आज 66 वा जन्मदिवस!
1 मार्च,1959 ला प्रकाशित झालेल्या या कादंबरीच्या पन्नासावर आवृत्त्या निघाल्या यातच या कादंबरीचे महत्त्व दडले आहे.
युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयानानंतर सुमारे दोन वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या या कादंबरीची अर्पणपत्रिका पुरेसी बोलकी आणि सूचक होय.
अण्णाभाऊंच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास,”जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव!
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेशासाठी सुरु केलेल्या सत्याग्रहाला उद्या 95 वर्षे पूर्ण होताहेत…
आपण जाणतो…
लढा सुरू झाला तेव्हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला जायचे होते.लढ्याची सूत्रे दादासाहेब गायकवाड यांच्या स्वाधीन करून बाबासाहेब रवाना झाले…
युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर तिकडे भारतातील अस्पृश्यांची कैफियत मांडत होते; तर इकडे दादासाहेब धर्ममार्तंडांच्या विरोधात लढा देत होते…
प्रदीर्घ काळ चाललेल्या या लढ्याचा शेवट सर्वज्ञात होय.अखेर बाबासाहेबांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे हिंदूधर्माला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली!
त्यानंतरचा इतिहास आणि बौद्धांची सद्यस्थिती ही सर्वांसमोर असल्याने नव्यानं सांगण्याची गरज नाही!!
अण्णाभाऊंनी सांगूनही व्यवस्थेवर घाव घालण्याऐवजी नवरदेवाची वरात अडविली…मंदिरात येऊ दिलं नाही… मारहाण झाली म्हणून निषेध… आंदोलन…करावी लागत असतील तर अण्णाभाऊंना किती वेदना होत असतील…अण्णाभाऊंचं साहित्य हे केवळ वाचण्यासाठी नाही तर अनुषंगिक वर्तन करण्यासाठी आहे !
काळाराम मंदिर प्रवेशदिनाच्या पूर्वसंध्येला संविधानाचे शिल्पकार,युगप्रवर्तक,युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड,समस्त सत्याग्रही आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन !