कमलसिंह यादव
प्रतिनिधी
जिल्हा नागपूर
पारशिवनी :-
पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारशिवनी येथे कार्यरत शिक्षिका सौ. आशाताई तेलंग ह्या ठराविक वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कर्तव्यपूर्ती सत्कार समारंभ शाळेच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने घेण्यात आला.
शाळेच्या प्रांगणात आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोपाल कडू यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षिका सौ. आशाताई भिमराव तेलंग यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक धनराज कळसाईत. भिमराव तेलंग. वासुदेव जिवतोडे. सरिता चोबितकर. रेणुका बोंदरे. संगीता चरडे. मंजुश्री खवले. मायाताई डेकाटे. मंगलाताई वैरागडे. उर्मिला चोपकर. कुंदा लूथळे. सपना खुबाळकर. तसेच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी अध्यक्ष जाकीर शेख. मोहन लोहकरे. उदाराम सोनकुसरे. सचिव देशमुख. माधुरीताई तांदुळकर. प्रतिक्षा बिसन. शालीनिताई चाचेरे. गौतम सावरकर. विनोद रेवतकर. मुकेश ढेकले. प्राजक्ता गिरघुसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तृप्तीताई कळंबे शिक्षिका यांनी प्रभावीपणे केले.
कर्तव्यपूर्ती सत्कार सोहळ्यास सत्कारमूर्ती सौ. आशाताई तेलंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धनराज कळसाईत यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल कडू यांनी विद्यार्थ्यांना. शिक्षक. उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. तृप्तीताई कळंबे यांनी केले. तर आभारप्रदर्शन वासुदेव जिवतोडे यांनी केले.