कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

 

       पारशिवनी :- 28 फेब्रुवारी 2023 रोज मंगळवार ला राणी अवंतीबाई वाचनालय, अखिलेश हायस्कूल, माहुली येथे श्री राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या संकल्पनेतून राजेंद्र मुळक सहाय्यता कक्षाच्या अंतर्गत आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोफत मार्गदर्शन व उपाय योजना करण्या करीता राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमातून विविध रोगांच्या निदानासाठी आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर तसेच मोठ मोठ्या रोगांवरील उपचारासाठी व सर्व प्रकारच्या शासनाच्या योजनांची माहिती देऊन सर्वसामान्य माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित सामूहिक शिबिराचे उदघाटन श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी केले. तसेच युवक मंडळींना खेळकुद च्या प्रती प्रोत्साहन म्हणून क्रिकेट किट व व्यायाम सामग्री (Gym Instrument) वाटप करण्यात आले.

या शिबिरात त्यात 

1) डोळे तपासणी – 1040,

2) मोफत चष्मा वितरण- 263,

2) सामान्य तपासणी- 900,

3) शस्त्रक्रिये करिता रुग्ण- 11, 

4) मोतिया बिंदू शस्त्रक्रिया रुग्ण- 130,

5) ECG तपासणी – 06,

6) रक्त तपासणी – 126,

7) स्त्री रोग तपासणी – 423,

8) बाल रोग तपासणी – 150,

9) पंचकर्मा – 20,

10) आधार कार्ड अपडेट- 40 ,

11) आयुष्मान कार्ड- 72,

12) बांधकाम नोंदणी- 80, 

13) नवीन व अपडेट राशन कार्ड नोंदणी- 56,

14) नवीन वोटिंग कार्ड – 8,

15) ई श्रम कार्ड – 11, 

16) निराधार नोंदणी – 41,

17) गट नोंदणी – 05

इत्यादी नागारिकानि लाभार्थींनी लाभ घेतला व शिबिराचे धेय साध्य करण्यास कमालीची साथ दिली.

        या वेळी सौ. रश्मीताई बर्वे (माजी जि. प. नागपूर), श्री. राजूभाऊ कुसुंबे (सभापती जि. प. नागपूर), सौ.मंगलाताई निंबोने (सभापती, पं. स. पारशिवणी), श्री. नरेश जी बर्वे (उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी), कू. करुणाताई भोवते (उपसभापती, पं. स. पारशिवणी), सौ. मीनाताई प्रफुल्ल कावळे (माजी सभापती, पं. स. पारशिवणी), श्री.चेतन देशमुख (माजी उपसभापती, पं. स. पारशिवणी), श्री.संदीप भलावी (सदस्य, पं.स.पारशिवणी), सौ.तुलसी ताई देयेवार (सदस्य, पं.स.पारशिवणी), श्री.अशोक चिखले (सभापती, कृ. उ.बा. स. पारशिवणी), श्री.प्रेम कुसुंबे (सरपंच, ग्रा. पं. माहुली), सौ.कुंती ताई कुसुंबे (सदस्य, ग्रा. पं. माहुली), सौ.अनिताताई पहाडे (सदस्य, ग्रा. पं. माहुली), सौ.अर्चनाताई घरत (सदस्य, ग्रा. पं. माहुली), श्री.बंटी भाऊ जयस्वाल (सदस्य, ग्रा. पं. माहुली), श्री.महेंद्र भाऊ घोडमारे (सदस्य, ग्रा. पं. माहुली), श्री.मोरेश्वर शेंडे (सदस्य, ग्रा. पं. माहुली), श्री.लीलाधर गायकवाड, कमलाकर कोठेकर सरपंच नवेगाव खैरी, सिताराम भारद्वाज, रामभाऊ ठाकरे, शालिक ढोंगे, गेंदलाल पहाडे, सेवक कुसुंबे, रूपचंद दिवटे, शिवचरण नारनवरे, इंद्रपाल गोरले, किशोर बर्वे, बंटी भाऊ निंबोणे, प्रवीण वाघमारे, नागो गायकवाड, मनोज चटप, सौरभ मांगुरकर, मयूर कुसुंबे, सुनील चिंचवडे, प्रज्वल गजभिये, महेश भारती, गुड्डू चौधरी, सुनील कुसुंबे इत्यादी मान्यवर शिबिरात आवर्जून उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News