डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

 

      गडचिरोली,(जिमाका)दि.01: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली द्वारे यावर्षी प्रथमच जिल्हयातील सिरोंचा येथील उरूस तसेच विविध तालुक्यातील 11 यात्रा ज्यामध्ये सोमनुर, गुमलकोंडा, वेकंटापूर, वांगेपल्ली, चपराळा, मार्केडा, वैरागड, देऊळगांव- आवळगाव, पळसगाव, अरततोंडी, डोंगरी या ठिकाणी दिनांक 18 फेब्रुवारी पासुन महाशिवरात्री निमीत्ताने विविध यात्रांचे आयोजन जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीणा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.   

              सदर यात्रांमध्ये यात्रा आपत्ती व्यवस्थापनाकरीता प्रथमच जिल्हयातील प्रशिक्षीत 300 आपदा मित्रांचा समावेश करण्यात आलेला. जिल्हयातील विशेषत: मार्कंडा येथील यात्रेमध्ये नदीपात्रामध्ये कोणतीही अनुचित घटना घडु नये या करीता एसडीआरएफ नागपूर येथील 26 जवानांचे पथक, पोलीस विभागातील बचाव पथक, बोट व इतर बचाव साहित्यासह तसेच आपदा-मित्र व आपदा-सखी यांचे पथक मार्कंडा येथे यात्रा कालावधीमध्ये तैनात करण्यात आले होते. सदर केलेल्या उपाययोजनामुळे जिल्हयातील सर्व यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यात आलेल्या असून कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. विशेषत: मार्कंडा येथे यात्रेमध्ये प्रंचड गर्दी अनुभवास मिळाली तसेच पळसगाव तालुका आरमोरी येथे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी प्रंचड मोठया प्रमाणावर गर्दी आढळून आली. दरवर्षी वांगेपल्ली तालुका अहेरी तसेच देऊळगांव –आवळगाव यात्रेत अनुचित घटना घडायच्या मात्र या वर्षी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही तसेच यावर्षी देऊळगांव-आवळगाव मार्ग बंद करण्यात आलेला होता. आपत्ती व्यवस्थापनाचे दृष्टीने जिल्हयातील सर्व आपदा मित्रांनी महत्वपुर्ण भुमिका पार पाडलेली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com