पंकज चहांदे 

दखल न्यूज भारत

 

देसाईगंज –

      देसाईगंज नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या नैनपुर वार्डातील तलाव परिसरात करण्यात आलेले अनाधिकृत अतिक्रमण तत्काळ हटवून तलावात साचलेला गाळ उपसा करून व तलावाचे खोलिकरण करून सौंदर्यीकरण करण्याची मागणी देसाईगंज शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्याधिकारी डाॅ. कुलभुषण रामटेके यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

    दिलेल्या निवेदनातुन त्यांनी नमूद केले आहे की, देसाईगंज नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या नैनपुर वार्डात येत असलेल्या सर्व्हे नं. १०८ आराजी २१.३८ हेक्टर आर. एवढ्या विस्तिर्ण जागेत तलाव आहे.लगतच्या परिसरातील येव्यामुळे तलावात गाळ साचुन तलाव उखळ झाले आहे. तलावाच्या जागेत करण्यात आलेल्या अनाधिकृत अतिक्रमण करुन जागा बळकवण्यात आल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

       अनाधिकृत अतिक्रमणामुळे भविष्यात तलावाचे परिसर अधिकाधिक कमी होत जाऊन नाममाञ तलाव शिल्लक उरण्याची भिती निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता या तलावा अंतग॔त परिसरात करण्यात आलेले अनाधिकृत अतिक्रमण तत्काळ हटवून तलावाचे खोलिकरण व सौंदर्यीकरण करून या ठिकाणी बोटींगची व्यवस्था करण्यात आल्यास शहर वाशियांसह लगतच्या परिसरातील नागरिकांसाठी छोटेखानी पर्यटनस्थळ उपलब्ध होऊ शकते. करीता उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

     निवेदन मुख्याधिकारी डाॅ. कुलभुषण रामटेके यांनी स्विकारले आहे. यावेळी देसाईगंज शहर काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे, गोविंदा चिंचोळकर, राजु गराडे, राहुल गजभिये, नरेश लिंगायत, आयुष्य सतवानी, अतुल गजभिये आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News