युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
खल्लार येथील तुळजाभवानी क्रिडा मंडळाच्यावतीने दि २५,२६फेब्रुवारीला जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.दोन दिवस पार पडलेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत जिल्ह्यातून अनेक संघ दाखल झाले होते.
जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस ७००१ रुपये तुळजाभवानी क्रिडा मंडळ खल्लारने पटकाविले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस ५००१रुपये तुळजाई क्रिडा मंडळ परतवाडा, तृतीय क्रमांकाचे बक्षिस ३००१रुपये उदय क्रिडा मंडळ जवळा शहापूर, चतुर्थ क्रमांकाचे सम्राट अशोक क्रीडा मंडळ गौरखेडा या संघाने पटकविले.