नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -जिल्हा माहिती कार्यालय भंडारा व जयहिंद कलापथक संच, रामसागर ग्रामीण विकास बहु. संस्था सोनेगाव च्या वतीने लाखनी व साकोली तालुक्यातील , मासलमेटा, मुंडीपार, केसलवाडा / पवार, जांभळी/सडक, घानोड , भिवसनटोला/जांभळी या गावात कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
त्या मध्ये रमाई आवास योजना, गटई योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाह योजना, जात पळताळणी प्रमाणात बनविण्यासाठी काय करावे लागेल, जादूटोना प्रतिबंधक कायदा या विषयावर गीत , प्रबोधन, पथनाट्य या माध्यमातून भावेश कोटांगले व संच यांच्या वतीने जनजागृती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दादळे व कार्यालयातील कर्मचारी लुटे आणि इतर कर्मचारी, पंचायत समिती चे पदाधिकारी व अधिकारी ,आणि संस्थापक दिलीप बिसेन व मार्गदर्शक मनोज कोटांगले यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे
कार्यक्रम सादर करीत असताना पंचायत समिती सदस्य, सरपंच ,तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्था अध्यक्ष व गावकरी बांधव यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
कलापथक संचात संच प्रमुख भावेश कोटांगले,व इतर कलावंत यशवंत बागडे, प्रल्हाद भुजाडे, अरविंद शिवणकर, सोनू मेश्राम, तेजस कोटांगले, सोनू लाडे, अतुल खेडीकर, अर्चना कान्हेकर, संगीता बागडे यांचा सहभाग होता.