कमलसिंह यादव
प्रतीनिधी
पारशिवनी:- तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी गाव येथील साईमंदिरच्या मागून अवैध दगळी कोळसाचा साठा मारोती कार मध्ये मिळुन आला.वेकोलि सुरक्षा अधिकारी यांनी सुरक्षा कर्मचारी व रविकात कंडे याचे सोबत आज पहाटे पॅट्रोलिग कारित असताना गुप्त माहितीच्या आधारावर कोळसा चोरणाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले व त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली.
टेकाडी येथे महाजन नगर साई मंदिरच्या मागे एका मारोती व्हॅन क्रमाक एम.एच.३१,ए.एच. २०३९ मध्ये कोळशा भरून निघत असताना आज पहाटेच्या गोपनीय माहीती नुसार सदर ठिकाणी धाड मारून कारवाई करण्यात आली.
दरम्यान आरोपी आकाश बंडु इंगळे वय २८ वर्ष राहणार महाजन नगर टेकाजी,ता. पारशिवनीला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन १ हजार ५०० किलो दगळी कोळसा किमत ०९ हजार आणि मारोती व्हॅन वाहना किमत २५ हजार रुपये सह असे एकुण ३४ रुपयांच्या मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टेला आरोपी आकाश बडु इगळे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .