कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-येथील दि लॉर्डस पब्लिक स्कूल येथे सोमवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी मराठी भाषा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. पारशिवनी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या हस्ते दीपप्रज्जलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी सौ नीलिमा ओम पालीवाल व शाळेच्या शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील पोषाख व व्यंजन स्पर्धेच्या मार्फत महाराष्ट्राचे गौरव गुणगान केले. पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावर प्रेरणादायी नाटक प्रस्तुत करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व शाळेच्या सर्व शिक्षकांचे शाळेत नवनवीन उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. लॉर्डस रामानुजन गणित स्पर्धेत प्रथम स्थान घेणार्या विद्यार्थ्यांना ‘चेस गेम’ भेट देण्यात आले. तर विद्यार्थ्यांना कंपास साहित्य देण्यात आले. आयोजनाकरीता सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.