राष्ट्रसंताच्या विचारातून उत्कृष्ट विद्यार्थी घडू शकतो :- राजूभाऊ देवतळे… — आमगाव जिल्हा भंडारा येथे संत स्मृती सोहळा संपन्न…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          आदर्श आमगाव जिल्हा भंडारा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी संचालित निवासी आश्रमशाळा च्या आयोजित गांधी स्मृती दिवस तथा संत स्मृती सोहळा कार्यक्रम प्रसंगी हभप प्रकाश महाराज वाघ, उपसेवाधिकारी दामोदर पाटील, विठ्ठलराव सावरकर, हभप प्रा. अशोक चरडे आदी उपस्थित होते.

          याप्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी चे कार्यकारणी सदस्य राजूभाऊ देवतळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापना केलेल्या निर्माण केलेले सेवाश्रम कार्य अविरहित राहून आमगाव येथील विद्यालयातुन विद्यार्थ्यांनी विद्यार्जन घेत प्रगती कडे वाटचाल करण्यासाठीच्या शुभेच्छा देत आजच्या घडीला संत थोर पुरुषांच्या विचाराची आवश्यकता असल्याचे सांगितले.