जिल्हा मिटर रिडर संघटनेचा बेमुदत आंदोलनाला काँग्रेसचा पाठींबा… – स्मार्ट मिटर हा रीडर युवकांना बेरोजगार करतील :- राजुरेड्डी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर : जिल्ह्यातील एम.एस.ई.डी. एल मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यलया समोर आज दिनांक 01 फेब्रुवारी 2025 पासून महावितरण तर्फे स्मार्ट मिटर लावल्या नंतर ही रीडर कामगारांनावयाच्या 60 वर्षी पर्यंत नियमित रोजगार देण्यात यावा किमान वेतन देण्यात यावे यामागणी साठी बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

         काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,तालुका सचिव विशाल मादर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन कामगारांच्या मागण्या समजून घेतल्या जिल्ह्यात सर्वांत आधी स्मार्ट मिटर विरोधात काँग्रेस पक्षच उतरला असून आज महावितरणचे अधिकारी फौल्टी मिटरच्या नावाखाली नागरिकांना कुठलीच माहिती न देता स्मार्ट मिटर बसवीत आहे.

       नवीन मीटर जोडणी घेणाऱ्या नागरिकांना देखील स्मार्ट मिटरच लावण्यात येत आहे.

        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात स्मार्ट मिटर लावणार नाही असे आश्वासन दिले होते.

          मात्र त्यांचा आश्वासन हा फसवा असून महाराष्ट्राला अंधारात ठेवण्याचा षडयंत्र आहे स्मार्ट मिटर हा रीडर कामगारांच्या रोजगारावर गदा आणणार असून काँग्रेस पक्ष हा स्मार्ट मिटर विरोधात शेवटच्या श्वासा पर्यंत आंदोलन करेल असा इशारा रेड्डी यांनी दिला.

         आंदोलनाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष निलेश रामटेके, उपाध्यक्ष संदीप घोगरे, कोशाध्यक्ष संजय पराते, सचिव योगेश पिसे, सहसचिव शफी शेख, संघटन मंत्री आशिष गेडाम, मारोती वरफडे, शेख महमद लकी, योगीराज खोब्रागडे, विशू बोरकर, रोशन तासूलवार, रवी कोवे, लोकेश बहादे, शरद कुळमेथे, राजू बोरकर, राजू वनकर व अन्य कामगारा तर्फे करण्यात येत आहे.