अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज (वडसा ) नॅक मूल्यांकन ‘अ’ दर्जा प्राप्त…

ऋषी सहारे 

  संपादक

देसाईगंज :- स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज (वडसा ) येथे दिनांक 17 व 18 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन डॉ. रवी क्रिष्णन यांच्या अध्यतेखाली डॉ. विनायग्गा मूर्ती, समन्वयक आणि डॉ. नाझिर सिमनानी सद्स्य यांच्या समितीने महाविद्यालयाचे मूल्याकंन केल्याने राष्ट्रीय स्तरावरून महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्याने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, व इतरत्र महाविद्यालाचे अभिनंदन केले जात आहे.

        डॉ. अनिल आय. थुल प्राचार्य अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज, डॉ. संजय बाळबुद्धे नॅक को- ऑडिनेटर नॅक समिती अ. स. म. देसाईगंज,कु.प्रभा मेश्राम,यांच्या अथक परीश्रमाने प्रा. राजेंद्र वालदे , डॉ. डी. टी. गजभिये, डॉ. शोभा टेभुर्णे, (भुरभुरे) , प्रा. अनिल बनपुरकर, प्रा.दिपक भागडकर, यांच्या सहकार्याने व परिश्रमाने त्याच प्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंदा जांभुळकर, सुरेश रामटेके मीना चहांदे,यांच्या सहकार्याने  महाविद्यालयास नॅक मुल्याकंनाचे ,’अ’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे अनिकेत शिक्षण संस्था दिघोरी (ना ) अध्यक्षा वैशाली टेंभूरकर, संस्था सचिव रोशन जांभुळकर यांनी वेळोवेळी महाविद्यालयास सहकार्य केले.

          ग्रामीण समुदाय विकास कार्याच्या अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्षपणे अध्ययन,करुन गावातील लोकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.

        समुदायात त्या आधारावर प्रत्यक्ष सास्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कार्यक्रम घेऊन समाज जागृती करण्यासाठी विविध प्रकारची कार्यक्रम,प्रत्येक्ष सामाजिक संशोधन कार्य,समाज विकास कार्यक्रम नॅक समन्वयक, डॉ. संजय बाळबुद्धे व त्यांचे सहकारी प्रभाताई मेश्राम ग्रंथालय व्यवस्थापन सहाय्यक, श्री कैलास बडवाईक, लघुलेखक, समाजकार्य विभाग प्रमुख प्रा. अनिल बनपुरकर, डॉ. रेखा झलके ग्रंथपाल प्रा, दिपक भागडकर, डॉ. डि. टी. गजभिये, डॉ. शोभा भुरभुरे, प्रा.राजेंद्र वालदे,गोविंदा जांभुळकर, अधिक्षक,सुरेश रामटेके,मीना चंहादे,अविनास रामटेके,राजू सोनकुसरे,संजय रामटेके,जेट्टू नागोसे, आदी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.महाविद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.